
केवळ चारच ठिकाणी चार्जिंग स्टेशन
तुर्भे : पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी एनएमएमटीच्या वतीने इलेक्ट्रिक गाड्यांना प्राध्यान्य दिले जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कल आहे. या बससाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र तो धूळखात पडून आहे. त्यामुळे अपुऱ्या चार्जिंग स्टेशनअभावी चार्जिंगची गैरसोय होत आहे. त्यातच चार्जिंगसाठी बराच वेळ लागत असल्याने अन्य गाड्यांतून प्रवाशांना पुढील प्रवास पूर्ण करावा लागत आहे.
पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर
सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढरीत गर्दी करतात. या गर्दीच्या नियंत्रणासाठी ड्रोन, एआयचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी ...