स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढवणार - मुख्यमंत्री

विदर्भाचा बॅकलॉग 2027 पर्यंत संपणार


अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढवणार आहे. या संदर्भातील निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समिती घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतही होऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.

अकोल्यातील भूमिगत गटार योजनेसाठी लागणारा महापालिकेचा 30 टक्के भाग राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच जनतेने आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी सत्ता दिलेली नाही, तर विकासासाठी दिलेला आहे. आमचा भविष्यात ऑनलाईन कामावर भर राहणार आहे. वर्षाच्या अखेर पर्यंत आम्हाला सर्व ऑनलाईन करायचं आहे. तसंच विदर्भाचा बॅकलॉग 2027 पर्यंत संपणार, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
Comments
Add Comment

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक

स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावरील 'रिसर्च प्रोजेक्ट'ला मंजुरी

डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर करणार संशोधन बीड : बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व