Gold Silver News: सोन्याच्या दरात वादळी वाढ! सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर 'इतक्या' रूपयांने वाढ

  179

प्रतिनिधी: आज सकाळी सोन्याच्या भावात वादळी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आज सोन्याचा दर गेला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारणांमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचे परिणाम सकाळपासूनच आशिया पॅसिफिक बाजारात झाले आहे.'गुड रिटर्न्स 'संकेतस्थळावरील माहितीनुसार सोन्याच्या २४ कॅरेट दरात प्रति ग्रॅम दर तब्बल ८१ रूपयांनी वाढला असून प्रति तोळा किंमत ९८४०० रूपयांवर पोहोचली आहे.तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७५ रूपयांनी वाढून ९०२० रूपयांवर पोहोचली आहे.तर प्रति तोळा किंमत ९०२०० रूपयांवर पोहोचली आहे.


१८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ६१ रूपयांनी वाढली असून ती ७३८० रूपयावर पोहोचली आहे तर १० ग्रॅम म्हणजेच एक तोळा किंमत ७३८०० रूपयावर पोहोचली आहे.देशातील मुंबई,पुणे,दिल्ली, कलकत्ता,बंगलोर अशा अनेक बहुतांश शहरातील सराफ बाजारात २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९८४० ते ९८५५ रूपये आहे.


सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात मोठे चढउतार आले होते. सलग चार दिवस वाढ झाल्यानंतर दोन दिवस बाजारात घसरण झाली आज पुन्हा सराफा बाजारात सोने रिबांऊड (Rebound)झाले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेला दबाव पाहता यांचे पडसाद आशियाई शेअर बाजारात पहायला मिळत आहे.नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली अतिरिक्त टेरिफ शुल्कवाढ ही त्यांच्या अधिकाराचे केलेले उल्लंघन असल्याचा ठपका त्यांच्यावर कनिष्ठ न्यायालयाने केला होता.त्याला सरकारने अपील दाखल केल्यानंतर अमेरिकन अपील न्यायालयाने टेरिफवरील शुल्कवाढ थांबवण्याची प्रकिया बंद करुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने निकाल दिला परिणामी टेरिफचा मार्ग आता मोकळा झाला आहे.तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्यापूर्वी अमेरिकेत येणार असलेल्या रोजगार डेटाची वाट गुंतवणूकदार पाहत आहेत.


परिणामी सोन्याच्या गुंतवणूकीत झालेली पर्यायी वाढ झाल्याने मागणीतही वाढ झाली परिणामी बाजारात वाढ झाली आहे. सकाळी युएस गोल्ड फ्युचर (Gold Future) मध्ये ०.५९% टक्के वाढ झाली होती. तर एमसीएक्स (MCX) वर सोन्याचा निर्देशांकात ०.३२% वाढ झाल्याने किंमत पातळी ९७१२० रूपयावर पोहोचली आहे.


चांदीच्या दरात ना वाढ ना घट !


चांदीचे भाव कालप्रणाणेच आहेत.अजूनपर्यंत त्यात कुठलाही बदल झालेला नाही.परवाच्या तुलनेत काल चांदीच्या दरात प्रति ग्रॅम किंमत १ रूपयांनी तर एक किलो चांदी १००० रुपयाने वाढली होती.त्यामुळे आजही चांदीची किंमत प्रति ग्रॅम १०९ रुपये असून प्रति किलो किंमत १०९००० रुपये पातळीवर कायम आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा

मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना