Elon Musk on Trump: "मी जरा जास्तच बोललो...", एलॉन मस्कने अखेर ट्रम्प यांना म्हंटलं Sorry!

वॉशिंग्टन: गेल्या काही आठवड्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump)  आणि उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. दोघांमधील हा वाद नेमका कुठपर्यंत जाणार यावर चर्चा रंगत असतानाच एलॉन मस्कने या वादाला पूर्णविराम दिला आहे.  एलॉन मस्क यांनी आपल्या पोस्टद्वारे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची माफी मागितली आहे,


टेस्ला आणि स्पेसएक्सच्या सीईओने सरकारमधील आपली भूमिका सोडल्यानंतर आणि रिपब्लिकन पक्षाच्या नवीन कर विधेयकाच्या प्रस्तावावर टीका केल्यानंतर एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी टीव्ही मुलाखती आणि एक्स पोस्टवरून एकमेकांबद्दल सार्वजनिक नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या दोघांमधील वाद विकोपाला गेले. ज्यात दोघांनी एकमेकांवर कठोर शब्दात सार्वजनिक टीका केली. पण यात एलॉन मस्क यांनी माघार घेतल्याचे दिसून येत आहे. एलॉन मस्क यांनी X वर ११ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून पोस्ट लिहिली. ज्यात त्यांनी म्हंटले, ”गेल्या आठवड्यातील माझ्या काही पोस्टसाठी मी माफी मागतो, कारण त्या थोड्या जास्त होत्या.” या दोघांमध्ये वादाचे नेमके कारण काय होते? याबद्दल जाणून घेऊ सविस्तर.





मस्क यांनी ट्रम्प यांच्या खर्च आणि कर कपात विधेयकावर जोरदार टीका केली, ज्याला ट्रम्प ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ म्हणत आहेत. यावर ट्रम्प यांनी मस्कला उत्तर दिले की, त्यांनी एलॉनला या विधेयकाबद्दल, विशेषतः इलेक्ट्रिक वाहन (EV) अनुदानात कपात करण्याबद्दल सांगितले होते, परंतु एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर प्रत्युत्तर देत म्हटले की हे विधेयक त्यांना कधीही दाखवले गेले नाही.


एवढेच नाही तर मस्कने ट्रम्प यांच्या महाभियोगाला पाठिंबा देणारी एक्स वर एक पोस्ट देखील केली होती, मात्र नंतर त्यांनी ती पोस्ट काही वेळाने हटवली देखील.  हे प्रकरण इतके वाढले की एलॉन मस्क यांनी ट्रम्पचे जेफ्री एपस्टाईनशी असलेले जुने संबंधही नमूद केले, ज्याला ट्रम्प यांनी जुना आणि खोटा मुद्दा आसल्याचे म्हंटले.



सरकारी कंत्राटे आणि अनुदाने संपवण्याची धमकी


एलॉन मस्कसोबतचा वाद वाढत असताना, ट्रम्प यांनी उघडपणे धमकीच दिली की ते मस्कच्या कंपन्यांसोबत, विशेषतः स्पेसएक्ससोबतचे सरकारी करार आणि अनुदाने संपवण्याचा विचार करू शकतात. ज्यामध्ये नासा मोहिमांमधून स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान काढून टाकणे यांचा समावेश आहे.  एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी असेही म्हटले की, “मला वाटते की आता आमचे नाते संपुष्टात आले आहे.”



मस्क यांनी माघार घेण्याचे कारण?


डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या खर्च आणि कर कपात विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरील कर सवलती रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकेतील मागील बायडेन प्रशासन नवीन ईव्ही खरेदीवर $७,५०० ची कर सवलत देत असे. ट्रम्प सरकार ही सवलत बंद करणार असून, नव्या विधेयकानुसार २००९ ते २०२५ दरम्यान दोन लाख ईव्ही विकलेल्या कंपन्यांना सूट मिळणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. एलॉन मस्कच्या टेस्लाला हा थेट धक्काच आहे.


तसेच, दुसरे कारण म्हणजे एलॉन मस्क यांना त्यांचे विश्वासू जेरेड आयझॅकमन यांना अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रशासक म्हणून नियुक्त करायचे होते, परंतु ट्रम्प यांनी त्यांच्या शिफारशीकडे दुर्लक्ष केले, ज्याचा फटका देखील टेस्लाला सहन करावा लागू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेता, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी पंगा एलॉन मस्क यांना पुढे अवघड होण्याची शक्यता आहे. आणि यामुळेच डोनाल्ड ट्रम्पविरुद्ध सुरू असलेल्या वादापासून त्यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे दिसून आले.

Comments
Add Comment

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही