पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, प्रमुख गोलंदाज टंग दुखापतग्रस्त

  64

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २० जूनपासून सुरुवात होतेय. पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जोश टंग दुखापतग्रस्त झाल्याने इंग्लिश संघाच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.


भारत ‘अ’ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्यावेळी जोश टंगला दुखापत झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे याची माहिती अजून मिळालेली नाही. इंग्लंड संघव्यवस्थापन कुठलाही धोका पत्करायला सध्या तयार नाही. कारण आधीच या संघाला दुखापतींनी ग्रासलं आहे. मार्क वुड दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर जोफ्रा आर्चरही सुरुवातीच्या कसोटी सामन्यांना मुकणार आहे.


जोश टंगला दुखापत झाल्याने इंग्लंडने १९ वर्षाय एडी जॅकला पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी संघात स्थान दिलं आहे. जॅक इंग्लंड लायन्सकडून भारताविरुद्धचे दोन्ही अनौपचारिक कसोटी सामने खेळला होता. या दोन्ही सामन्यात त्याला केवळ दोनच बळी घेता आले होते.



भारत वि इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक


पहिली कसोटी २० ते २४ जून- हेडिंग्ले, लीड्स


दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबेस्टन, बर्मिंगहम


तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स, लंडन


चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर


पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - द ओव्हल, लंडन

Comments
Add Comment

IND vs ENG: करुण नायरने केले शुभमन गिलच्या नेतृत्वाचे कौतुक

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या कसोटी मालिकेत धीराने नेतृत्व केल्याबद्दल भारतीय फलंदाज करुण नायरने

नीरज चोप्राने या महत्त्वाच्या भालाफेकीच्या स्पर्धेतून घेतली माघार

नवी दिल्ली: भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम या दोघांनीही आगामी सिलेसिया डायमंड लीगमधून माघार

रोहित आणि विराटसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा शेवटचा ठरणार ?

मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.