‘त्या’ शाळांमधील विद्यार्थी समायोजनाकडे पाठ

उन्हाळी सुट्ट्यांमुळे पालिकेपुढे पेच


ठाणे : अनधिकृत शाळांवर ठाणे पालिकेकडून कारवाई करीत बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या शाळांतील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु अनधिकृत शाळांच्या पालकांची मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजनास करण्यास उदासीनता दिसून आली आहे. अधिकृत शाळांची फीदेखील परवडणारी नसल्याने पालकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने पालक गावी गेल्याने त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.



ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांचा आढावा घेऊन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ८१ अनधिकृत शाळांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यापैकी ६८ शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर १३ शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या शाळांमधून १९ हजार ७०८ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली होती. ज्या अनधिकृत शाळा सुरू आहेत त्या तत्काळ बंद करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाने संबंधित शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून