Sonam Raghuvanshi: राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने सुटणार होती सोनम, पोलिसांच्या ट्रिकमुळे अडकली

इंदूर: राजा रघुवंशीची हत्या (Raja Raghuvanshi Murder) केल्यानंतर सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. जेणेकरून राजा रघुवंशीची हत्या कशी झाली हे कुणालाच कळणार नव्हतं. मात्र,  पोलिसांनी दोघांचाही प्लॅन अगदी सहजपणे उधळून लावला, यासाठी पोलिसांनी एक ट्रिक वापरून पाहिली, ज्यामुळे सोनमने सर्व काही भडभडा ओकून दिलं.


राजा रघुवंशीचे शव मिळाल्यानंतरही सोनमचा काही पता लागत नव्हता. यादरम्यान सोनमचे कुणी अपहरण केले आहे का? याबाबत पोलिस तपास करत होते. मात्र सीसीटीव्ही फुटेजवरील सोनमचे काही संशयास्पद हावभाव पाहता, तिनेच हा कट रचून आणल्याचा संशय दाट होत गेला. दरम्यान, सोनमला अटक करण्याआधी कॉल डिटेल्सच्या आधारे, सोनमचा प्रियकर राज कुशवाहला ८ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान शिलाँग पोलिसांनी अटक केली. सोनमला पकडल्यानंतर दोघांचंही गाझीपूरमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलं. सोनमला सांगण्यात आलं की, राज कुशवाह याने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे, आता तू सर्व सांगून टाक. यानंतर सोनमने संपूर्ण सत्य सांगितलं.



राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम आणि राजचा काय प्लॅन होता?


राजा रघुवंशीच्या हत्येला लुटमारीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न सोनम आणि राज कुशवाहचा होता. या दोघांचा प्लॅन होता की, सोनम गाझीपूरमध्ये अशा स्थितीत सापडेल की तिला लुटण्यात आलं आहे आणि तिचा नवरा मारला गेल्याचं दाखवलं जाईल. दरोडेखोरांनी मला इथेच सोडलं असं सोनमला सांगायला सांगितलं. सोनमने ढाबा मालकाला देखील हेच सांगितलं होतं. सोनम आणि राज यांनी असा प्लॅन केला होता की, सोनम अशा प्रकारे कुटुंबासमोर येईन, जेणेकरून कोणीही त्यांच्यावर संशय घेणार नाही. पण पोलिसांच्या ट्रिकने त्यांचा प्लॅन पूर्णपणे फसला.

Comments
Add Comment

कफनचोरांना जेलमध्ये पाठवणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा; ठाकरेंनी वडापावव्यतिरिक्त मराठी माणसाकरता कधी स्वप्न पाहिले

मराठी माणसांचे महत्व मुंबईत कधीही कमी होणार नाही

दिशाभूल करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या खोटेपणाचा घेतला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाचार मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

तब्बल ६० हजार मुंबईकरांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप

तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांचे प्रशिक्षण १० हजार २३१ मतदान केंद्रांची उभारणी मुंबई (विशेष

दुबार मतदारांपैंकी ४८ हजार मतदारांचा मतदानाचा मार्ग मोकळा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या बनवताना दुबार मतदारांचा शोध घेण्यात येत

एका वेळी दोन प्रभागांचीच होणार मतमोजणी

मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी एका वेळी दोनच

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका