RCB IPL News: आरसीबी बंगलोर संघ विकणे आहे! डियाजिओ फ्रेचांयजी विकण्याच्या तयारीत ! 'ही ' कारणे जबाबदार

प्रतिनिधी: आरसीबीला आता नवा मालक मिळू शकतो. तसे संकेत प्रसारमाध्यमांनी दिले आहेत. आरसीबी टीमची मालक असलेली डियाजिओ पीएलसी (Diageo PLC) आता आपली मालकी विकण्याच्या तयारीत आहे. डियाजिओ कंपनीची मुख्य कंपनी युनायटेड स्पिरीटस लिमिटेड (United Spirits Limited) ही मद्य बनवणारी कंपनी आहे. भारतीय युनिट कंपनी असलेल्या डिआजिओ कंपनी टीमची फ्रेजांयजी विकण्याच्या गंभीरपणे विचार करत आहे. तशी पावलेच कंपनीने उचलली आहेत. कंपनीने याबद्दल कुठलेही भाष्य केलेले नाही.


युनायटेड स्पिरीटस कंपनीच्या वतीने कंपनीच्या व्यवसायाची पुनर्रचना (Restructuring) होऊ शकते. ज्या उत्पादनात अधिक उत्पन्न अथवा कमी परताव्याच्या बदल्यात अतिरिक्त खर्चिक व्यवसायी युनिट्स विकण्याचे कंपनीचे धोरण आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला आहे. याशिवाय बीसीसीआयने खेळात मद्य व तंबाखूच्या जाहिराती किंवा त्याला प्रसिद्धी देत असलेल्या सर्व गोष्टीवर पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय भारत सरकारच्या स्वास्थ मंत्रालयाने (Health Ministry) ने आयपीएलसारख्या मोठ्या खेळ टूर्नामेंटवर अंमली पदार्थांच्या सेवनाविरूद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाहिरातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा पदार्थांना यापुढे आयपीएल (IPO) मध्ये बंदी आणण्याचा निर्णय घेतला गेला. त्याचीही दखल घेत युनायटेड स्पिरीट लिमिटेडची कंपनी डियाजिओने आपली मालकी असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघ विकण्याचा निर्णय घेतला.


याविषयी प्रतिक्रिया देताना सरकारने म्हटले आहे की, 'आयपीएल हा भारतातील सर्वाधिक पाहिला जाणारा क्रीडा स्पर्धा आहे. जेव्हा दारू आणि तंबाखूचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचार केला जातो तेव्हा तो आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल चुकीचा संदेश देतो.' मंत्रालयाने आयपीएलशी संबंधित सर्व कार्यक्रम आणि स्टेडियममध्ये दारू आणि तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.


प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे डियाजिओ कंपनीच्या प्रवक्त्याने यावर बोलणे टाळले आहे. एका जवळच्या व्यक्तीने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ' हा निर्णय अजून अंतिम नाही ते कदाचित हा विकण्याचा निर्णय घेऊ शकतात.' यापूर्वी २०१२ मध्ये बियर कंपनी किंगफिशरचे मालक व टायकून विजय माल्या यांनी संघ खरेदी केला होता. मात्र मल्ल्या कर्जबाजारी झाल्यानंतर त्यांनी टीमची मालकी सोडून हे हस्तांतरण डियाजिओला केले होते. डियाजिओनेच किंगफिशर खरेदी केली होती.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अमेरिकेत डियाजियोची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. टॅरिफ आणि ग्राहकांच्या मंदीचा प्रीमियम मद्य विक्रीवर परिणाम झाला.जागतिक स्तरावर कंपनी कामकाज सुव्यवस्थित करत असताना आणि नॉन-कोर (अतिरिक्त) मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन केले जात आहे यामुळेच विक्री करून कंपनीला भांडवल मिळू शकते.


जर हा व्यवसाय कंपनीने विकल्यास आरसीबी सारखी प्रतिष्ठित कंपनी घेण्यासाठी दिग्गज व्यापारी पुढे सरसावतील. टीमचे सध्याचे मूल्यांकन २ अब्ज रूपयांहून अधिक आहे. यंदा पहिल्यांदाच आरसीबी २०२५ ची आयपीएल (IPL 2025) जिंकली होती. त्यामुळे या आगामी बिडिंग मधील आरसीबीचा मालक कोण बनतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.