Sonam Raghuwanshi : ‘कुऱ्हाडीने हत्या’; ५० हजाराची सुपारी...राजाच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?

  87

राजा रघुवंशीच्या मर्डरचा पत्नीनेचं रचला कट



मेघालय : पत्नी सोनम रघवंशीच बेवफा सनम ठरली. प्रेमामध्ये अडथळा ठरणाऱ्या पती राज रघुवशींची प्रियकराच्या मदतीने थंड डोक्याने काटा काढण्याची योजना तिनं आखली. मेघालयमधील निसर्गरम्य शिलाँगमध्ये सुरु झालेली एक हनिमून ट्रिप एका भयानक हत्येच्या रूपात संपली. इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी (Raja Raghuwanshi) आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuwanshi)  २० मे २०२५ रोजी शिलाँगला पोहोचले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसांत, २३ मे रोजी एक असा कट रचण्यात आला, ज्याने राजाचा जीव घेतला आणि देशभरात खळबळ उडाली. या गुन्ह्यात आता त्याची पत्नी सोनम हिचेच नाव पुढे आले असून, तीच पतीच्या हत्येच्या कटात सहभागी होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात दरदिवशी नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला अटक केली आहे. त्याशिवाय अन्य चार आरोपींना सुद्धा अटक केली आहे. पोलिसातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने प्रियकराच्या मदतीने मिळून हत्येचा कट रचला. लग्नानंतर अवघ्या ५ दिवसात सोनमने राजा रघुवंशीच्या मर्डरची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली.




'मी विधवा होईन',मग पप्पा... 


राजा आणि सोनमच लग्न ११ मे रोजी झालं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. सर्वकाही सामान्य वाटत होतं. पोलीस सूत्रांनुसार, १६ मे रोजी सोनमने प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून राजाला मार्गातून हटवण्याची योजना बनवली. सोनमने राज कुशवाहला सांगितलं, राजा रघुवंशीला संपवून टाक. लुटीमारीच्या उद्देशाने हत्या झाली आहे, असं भासवू. त्यानंतर मी विधवा होईन. मग पप्पा आपल्या लग्नाला मंजुरी देतील.




हत्या कशी घडली?


२२ मे रोजी हे जोडपे मावलाखियात गावात पोहोचले होते आणि दोघे ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या एका होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता ते स्कूटीवर बाहेर पडले आणि त्यानंतर दोघेही गायब झाले. २४ मे रोजी रात्री त्यांची स्कूटी शिलाँगपासून २५ किमी अंतरावर ओसारा हिल्सच्या पार्किंगमध्ये सापडली. २८ मे रोजी जंगलात दोन बॅगा सापडल्या. राजाच्या भावाने या बॅगांची ओळख पटवली. त्याच दिवशी वेसाडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीतून राजाचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत देहाजवळ सोनमचे कपडे, औषधं, आणि एक रक्ताने माखलेला 'दाओ' (खासी जमातीचा पारंपरिक चाकू) मिळाला. पोस्टमॉर्टम अहवालानुसार राजावर निर्दयपणे हल्ला झाला होता – त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून, चाकूने अनेक वार करण्यात आले होते.



हत्येसाठी किती हजार दिले?


पोलीस सूत्रांनुसार राजाची ज्या कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली, ती गुवहाटीत ऑनलाइन ऑर्डर करण्यात आली होती. आरोपी घटनेच्या आधी सोनमच्या होमस्टेपासून १ किलोमीटर अंतरावर थांबले होते. सोनम त्यांना लोकेशन पाठवत होती. सोनमने या हत्येसाठी ५० हजाराची सुपारी दिली होती.




सोनमचाच सहभाग, आत्मसमर्पणानंतर कबुली!


सोनम तब्बल १७ दिवस बेपत्ता होती. अखेर ८ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर अत्यंत अस्वस्थ अवस्थेत आढळली. तिने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खळबळजनक कबुली दिली की, तिनेच पतीच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिली होती. या धक्कादायक ट्विस्टने संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. मात्र, सोनमच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला की, ते त्यांच्या मुलीला जबरदस्तीने गुन्हेगार ठरवत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम निर्दोष आहे.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात