कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील महत्त्वाचा दुवा

गृहराज्यमंत्री भोयर यांचे प्रतिपादन


पालघर : गाव पातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा आहे. असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पालघर येथे सोमवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.



या कार्यशाळेस खा. हेमंत सवरा, आ. राजेंद्र गावित, आ. हरिश्चंद्र भोये, विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.


मागच्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटील हे तुटपुंज्या २ हजार ते ३ हजार मानधनावर काम करीत होते. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना १५ हजार रुपये मानधन केले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून पोलीस पाटील यांची अनेक पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तत्काळ भरून २८२ रिक्त पदे भरण्यात आली आहेत, अशी माहिती भोयर यांनी दिली. आताच्या काळात प्रत्येक क्षेत्र हे डिजीटल होत आहे. पोलीस पाटील यांना सुद्धा डिजीटल होणे आवश्यक आहे. आता या क्षेत्रात महिला पोलीस पाटीलसुद्धा काम करत असून त्या आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत, याचा आनंद आहे. पालघरच्या धर्तीवर अशी कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्याकरीता पोलीस पाटील हे पद महत्वाचे आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या पदाची कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस कारागृह बांधकामाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते.

Comments
Add Comment

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना