“आगळीक केल्यास पाकिस्तानात घुसून मारू”- एस. जयशंकर

नवी दिल्ली : पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची आगळीक केल्यास आम्ही पाकिस्तानात घुसून मोठा हल्ला करू असा इशारा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. जयशंकर सध्या युरोप दौऱ्यावर असून बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे जयशंकर यांनी हे वक्तव्य केलेय.

याप्रसंगी सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान हजारो दहशतवाद्यांना उघडपणे प्रशिक्षण देतो आणि त्यांना भारतात हल्ले करण्यासाठी पाठवतो. भारत यापुढे हे अजिबात सहन करणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत एस जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, जर त्यांनी एप्रिल महिन्यात केलेली क्रूर कृत्ये थांबवली नाहीत, तर त्यांना भारताकडून प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल. दहशतवादी पाकिस्तानच्या आत असतील, तर आम्ही पाकिस्तानच्या आत जाऊन हल्ला करू असा इशारा त्यांनी दिला.


पाकिस्तान हा असा देश आहे, जो दहशतवादाचा वापर साधन म्हणून करतो. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर निश्चितच पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध होऊ शकते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानी हवाई दलाचे बरेच जास्त नुकसान झाले आहे. याच कारणामुळे पाकिस्तानला भारतासमोर युद्धविरामासाठी हात जोडावे लागले. राफेल विमानांनी केलेली कारवाई किती यशस्वी झाली, याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेले हवाई तळ असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला