Sonam Raghuvanshi: सोनमने ज्याच्यासाठी श्रीमंत पतीला संपवलं, त्या राज कुशवाहची संपत्ती किती?

इंदूर: मेघालय येथे बेपत्ता झालेल्या इंदूरच्या नवविवाहीत जोडप्याचे (Indore Missing Couple) गूढ अखेर उलगडले! पण त्याबरोबरच सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi)ने आपल्याच पतीविरुद्ध रचलेल्या हत्याकांडांचे भीषण रूपदेखील जगासमोर आले. प्राथमिक माहितीनुसार, सोनमचे लग्नाच्या आधीपासूनच राज कुशवाहा याच्यासोबत अफेअर होते. असे म्हटले जाते की तिच्याच सांगण्यावरून राज कुशवाहा (Raj Kushwaha) याने राजा रघुवंशीची (Raja Raghuvanshi) हत्या घडवून आणली. त्यासाठी त्यांनी मेघालय येथे जाऊन राजा रघुवंशीला संपवले.  पण, प्रश्न हा पडतो की, ज्यासाठी सोनमने लाखोंचा व्यवसाय करणाऱ्या अपल्या पतीला म्हणजेच राजा रघुवंशीला संपवले, तो राज कुशवाह नेमका किती कमावतो? त्याची संपत्ती किती आहे?


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज कुशवाहनेच राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला होता. शिवाय तो सोनमपेक्षा ५ वर्षांनी लहान देखील आहे, त्याच्या प्रेमात अखंड बुडालेल्या सोनमने मेघालय येथे पतीसोबत हनिमूनला जाण्याचे नाटक करत, राजा रघुवंशीला मारण्याची सुपारी दिली. या राज कुशवाहसोबत सोनमचे सूत कुठे आणि कधी जुळले याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.



सोनमच्या वडिलांच्या कंपनीत कर्मचारी म्हणून काम


सोनमला इंदूर येथे अटक केल्यानंतर, तिने आपल्या गुण्याची कबुली देत सर्व काही सांगितले. त्यादरम्यान तिचे राज कुशवाहसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. यानंतर मग लोकांना राज कुशवाह कोण आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली. तर हा राज कुशवाह सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात कर्मचारी आहे. तो तिथे  बिलिंगचे काम करायचा. सोनमची येथेच याच्याशी भेट झाली. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली.



राज कुशवाहाचा पगार किती होता?


राज कुशवाहा सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात बिलिंगचे काम पाहायचा. त्याचे वार्षिक उत्पन्न जेमतेम दोन लाखांच्या घरात होते. त्यानुसार, त्याचा पगार १५ ते २० हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. त्याचे राहणीमानही फारसे उच्चभ्रू नव्हते. सोनमची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता, राज कुशवाहा फारच गरीब होता. सोनम त्याच्यापेक्षा खूपच श्रीमंत होती. तिच्या कुटुंबाचे इंदूरमध्ये स्वतःचे घर होते.


कुटुंबाचा दावा आहे की त्यांना त्यांच्या प्रेमसंबंधाची काहीच कल्पना नव्हती. म्हणूनच त्यांनी सोनमचे लग्न लावून दिले होते.  सध्या केवळ आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी केली जात आहे. पण पुढील चौकशीत आणखीही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.



Comments
Add Comment

पालघर नगरपरिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी !

महायुतीमध्येही पडली उभी फूट पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषदेसह एका नगरपंचायत

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे

कुठे काका विरुद्ध पुतण्या, तर कुठे दादा, भावजयी रणांगणात

नगर परिषद निवडणुकीत ‘घर घर की कहानी’ गाजणार मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर

अनगरमध्ये भाजपचा एकहाती विजय! १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून

अनगर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपने सर्व

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे.