हुश्श ! व्यत्ययानंतर हार्बर आणि ट्रान्स हार्बरची वाहतूक पुन्हा सुरू

  91

नेरुळ : नेरुळ स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सकाळी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होती. तंत्रज्ञांनी हा बिघाड दुरुस्त केला. यानंतर रेल्वे वाहतूक हळू हळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होती. यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. कामावर जात असलेल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पण त्रज्ञांनी हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर रेल्वे वाहतूक हळू हळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. "किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा काही काळासाठी विस्कळीत झाल्या होत्या. आता सकाळी ०८:४७ वाजता या सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. गैरसोयीबद्दल क्षमस्व," असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
Comments
Add Comment

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली