बाराव्या म्हाडा लोकशाही दिनात ८ अर्जांवर झाली सुनावणी

  45

लोकाभिमुख निर्णयातून अर्जदारांना मिळाला दिलासा


मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) वांद्रे (पूर्व) येथील गृहनिर्माण भवनात १२वा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लोकशाही दिनात नागरिकांच्या ८अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. आजच्या लोकशाही दिन कार्यक्रमात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी नागरिकांप्रती जबाबदारी, पारदर्शकता आणि न्यायप्रिय प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित करत तत्परतेने निर्णय घेतला.



अँटॉप हिल वडाळा पूर्व येथील सदनिकेचा ताबा विकासकाकडून मिळू शकला नाही याकरिता निगुडकर यांनी अर्ज केला होता. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी सदर प्रकरणी चर्चा करण्यासाठी संबंधित विकासकास तात्काळ म्हाडा कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच निगुडकर यांना वितरित करण्यात आलेल्या बृहतसूचिवरील सदनिकेचा ताबा आज सकाळी बारा वाजेपर्यंत देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गोरेगाव पश्चिम येथील स्नेहदीप सोसायटीच्या मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याच्या विरूद्ध संजय भैरे यांनी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी सोसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेवर होत असलेला अनधिकृत वापर तत्काळ थांबवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.


तसेच गिरगाव येथील भंडारवाडा क्रॉस रोडवरील दुर्गादेवी सोसायटी या पुनर्रचित इमारतीच्या दुरुस्तीचे काम करून देण्याच्या मागणीसाठी गणेश शिंदे यांनी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी इमारतीच्या बाहेरील भागातील पाईपची व बंद पडलेल्या लिफ्टची तात्काळ दुरुस्ती करावी. सदर दुरुस्तीचे काम सोसायटीतील सभासदांनी नेमलेल्या देखरेख समितीच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकशाही दिनात मुंबई मंडळाशी संबंधित ४, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळ ३, छत्रपती संभाजी मंडळाशी संबंधित १ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली