रविवारच्या सुट्टीस १३५ वर्षे पूर्ण

  59

नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतरत्न देण्याची मागणी


मुंबई : भारतीय चळवळीचे जनक, रविवारच्या सुट्टीचे निर्माते नारायण मेघाजी लोखंडे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे, कनेरसर, जि.पुणे येथील सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८४८ रोजी झाला व निधन ९ फेब्रुवारी १८९७ रोजी झाले. भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते. भारतावर ब्रिटीशांचे राज्य असताना कामगार हितासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले.



भारतीय मिल व इतर कामगारांना आठवड्यातील सातही दिवस काम करायला लागायचे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवारच्या सुट्टीचा प्रस्ताव ब्रिटीश सरकारसमोर सन १८८३ मध्ये ठेवला; परंतु ब्रिटीशांनी तो धुडकावला. आठवड्यातून एक दिवस देशसेवेसाठी व समाजसेवेसाठी कामगारांना मिळायला हवा; त्या दृष्टीने रविवारची सुट्टी मिळावी या मागणीसाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी संघर्ष केला; सात वर्षांच्या संघर्षानंतर दि.१० जून १८९० रोजी ब्रिटीश सरकारतर्फे गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी भारतात रविवार हा सुट्टीचा दिवस घोषित केला.मुंबईत १८९३ मध्ये हिंदू-मुसलमान दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ब्रिटीश सरकारने रावबहाद्दूर ही पदवी बहाल केली.


रविवारच्या सुट्टीस १० जून २०२५ रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी देशातील कामगार चळवळीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. रविवारच्या सुट्टीचे निर्माते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते. दि. ३ मे २००५ रोजी भारत सरकारने रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शुभहस्ते त्यांच्या पोस्ट तिकीटाचे अनावरण केले होते. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना त्यांच्या अलौकिक कार्यामुळे भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारकडे भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करावी अशी मागणी टाव्हरे यांनी निवेदनात केली आहे.

Comments
Add Comment

'ड्रग तस्करी प्रकरणी मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई होणार'

मुंबई : ड्रग तस्करी प्रकरणी अटक केलेल्यांवर मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री

उबाठानेच केला मराठीचा घात, शिवसेनेची बॅनरबाजी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा पहिलीपासून शाळेत सक्तीच्या

पुढील शंभर वर्षांचा विचार करुन प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा; अजितदादांची अधिका-यांना तंबी

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला

महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा

उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका मुंबई : दादरस्थित महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

'पुण्ये अशी येती फळाला' : बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

मुंबई : भाजपा पक्ष संघटनेत फेरबदल झाले असून रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. चव्हाण यांच्या

बीडमधील लैंगिक शोषणाची होणार एसआयटी चौकशी

मुंबई : बीड येथील शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या