सोन्याच्या मूल्याच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार!

मुंबई : जनसामान्यांना कठीण प्रसंगात सोने तारण ठेऊन जलद कर्ज मिळविणे मदतकारक ठरते, त्यामुळे छोट्या कर्जदारांसाठी रिझर्व्ह बँकेने दिलासा देणारा निर्णय घेतला असून, त्यांना त्यांच्या सोन्याच्या मूल्याच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज आता मिळविता येईल. आतापर्यंत बँकांकडून कर्ज रक्कम सोन्याच्या मूल्याच्या कमाल ७५ टक्के भरेल इतकीच निर्धारीत केली जात होती.


प्रति कर्जदार २.५ लाख रुपयांपेक्षा कमी सोने तारण कर्ज घेणाऱ्यास, सुवर्ण मूल्याच्या) ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यास बँकांना मुभा देणाऱ्या आदेशाला रिझर्व्ह बँकेकडून लवकरच अंतिम रूप दिले जाणार आहे. सुवर्ण मूल्याची गणना ही मुद्दल आणि व्याज दोहोंना विचारात घेऊन केली जाईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. बँकेतर वित्तसंस्थांकडील कर्जदाते आणि लहान बँकांच्या बाबतीत, एलटीव्ही हे सध्या ८८ टक्क्यांपर्यंत जाणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


काही महिन्यांपूर्वी, रिझर्व्ह बँकेने सोने तारण कर्जाबाबत एक धोरण मसुदा तयार केला होता. त्याबाबत संबंधित भागधारकांची सल्लामसलत आणि होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर अंतिम निर्देश तयार केले गेले आहेत, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. परंपरागत स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले सोन्याबाबत खरेदीच्या पावत्या सादर करता आल्या नाहीत, तर कर्जदाराने स्व-घोषित प्रतिज्ञापत्र दिले तरी चालू शकेल.


सोने तारण कर्जासंबंधी नियम सर्वच वित्तसंस्थांमध्ये आणि देशात सर्व ठिकाणी एकसारखेच असावेत, या दिशेने कठोर नियम प्रस्तावित केले आहेत. यानुसार सोने तारण कर्ज देताना त्याचे प्रमाण तारण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, असेही या मसुद्यात आहे. छोट्या कर्जदारांवर याचा कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची खात्री करण्यासाठी डीएफएसने मध्यवर्ती बँकेला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे २.५ लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज घेणाऱ्या छोट्या कर्जदारांना निर्देशांमधून वगळण्याची सूचना केली होती.

Comments
Add Comment

चीनमध्ये गलका, ट्रम्पना दणका

अलीकडच्या चर्चीत आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींपैकी एक म्हणजे भारताच्या वाढत्या ईव्ही उत्पादनामुळे ड्रॅगनला

Starlink इंटरनेट सेवा भारतात लवकरच सुरु होणार

मुंबई : एलन मस्क यांची स्टारलिंक कंपनी ही लवकरच भारतात सुरु होणार आहे. यासाठी कंपनीने नऊ भारतीय शहरांमध्ये

मुकेश अंबानी यांची फेसबुक सोबत ८५५ मिलियनची युती

मुंबई : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज एक मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स ची

गूगल पे, पेटीएम आणि फोन पे ला टक्कर देणार स्वदेशी झोहो पे

मुंबई : बिझनेस सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आपली मजबूत ओळख निर्माण केल्यानंतर आता झोहो कंपनी डिजिटल पेमेंटच्या

Gold Rate Today: दिवाळीसह छटपूजेमुळे सोन्याच्या मागणीत तुफान वाढ सोने कालच्या घसरणीनंतर आज पुन्हा रिबाउंड होत महागले !

मोहित सोमण: काल संध्याकाळच्या रिबाउंडनंतर पुन्हा एकदा सोन्याने नागमोडी वळण घेतले. त्यामुळे जागतिक व्यापारातील

सेबीकडून मोठा निर्णय! प्री आयपीओ म्युच्युअल फंड प्लेसमेंटवर बंदी

मोहित सोमण: गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सेबीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या नव्या