WTC 2027: कसोटी चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडियाला करावे लागतील ही ३ कामे

  53

मुंबई: भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसोबतच त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रवासालाही सुरूवात होईल. दरम्यान, यावेळेस संघ अतिशय नवखा आणि कमी अनुभव असलेला आहे. असे असतानाही संघात असे काही खेळाडू आहेत जे हा प्रवास सोपा करू शकतात.


इंग्लंडचा दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला हे. यावेळेस हा दौरा संघाच्या मोठ्या बदलादरम्यान आहे. भारत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाविरुद्ध सलग मालिका हरला आहे. यासाठी जर संघाला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्राची सुरूवात चांगली करायची असेल आणि त्याला चांगला ठिकाणी न्यायचे असेल तर काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.



गोलंदाजीच्या आक्रमणामध्ये सुधारणा


२०१६ पासून ते २०२१ पर्यंत भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठे कारण होते के त्यांची मजबूत गोलंदाजी. मात्र गेल्या दोन चॅम्पियनशिपमध्ये या गोलंदाजीच्या या आक्रमणामध्ये बदल होत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराहवर संघ अवलंबून होता. हा एकमेव गोलंदाज होता ज्याने विरोधी संघाला त्रस्त केले होते.


मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज दुखापतींमुळे सतत आतबाहेर करत असतो. त्यामुळे गोलंदाजीची धार बोथट झाली आहे. आर.अश्विनच्या निवृत्तीनंतर स्पिन हल्लाही कमकुवत झाला आहे. यामुळे टीम इंडियाला आपली गोलंदाजी मजबूत करावी लागेल.



कोहलीच्या जागेला पर्याय आणि केएल राहुल


केएल राहुल भारतीय संघातील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक आहे. दरम्यान, त्यासाठी एक निश्चित फलंदाजी क्रम ठरवणे गरजेचे आहे. राहुल कधी सलामीसाठी येतो तर कधी मधल्या फळीत. विराट आणि कोहलीच्या निवृ्त्तीनंतर आता त्याच्या जागेवर पर्याय शोधणे गरजेचे आहे.



नवे नेतृत्व मजबूestत बनवणे


भारताच्या फलंदाजीचा क्रम रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर अवलंबून होता. मात्र दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीनंतर आता संघाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक मजबूत लीडरशिप युनिटची गरज आहे. शुभमन गिल कर्णधार आणि ऋषभ पंत उपकर्णधार आणि विकेटकीपर बनवण्यात आले आहे. त्यामुळे यांच्या नेतृत्वाने योग्य ते निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात उतरवायला हवेत.


दरम्यान, केवळ कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यावरच अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे मैदानावर उतरणारे सर्व क्रिकेटर हे यश-अपयशासाठी कारणीभूत असतात. अशातच ज्युनियर खेळाडूंनाही जबाबदारी घ्यावी लागेल आणि एकजूट होत चांगली कामगिरी करावी लागेल.

Comments
Add Comment

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून