मुंबईत अवकाळी पावसाचा सुक्या मासळीला फटका

कोळी महिला व्यावसायीकांची सरकारकडे आर्थिक मदत देण्याची मागणी


मुंबई : अवकाळी पावसाचा फटका सुकी मासळीलाही बसला आहे. कोळी महिला व्यावसायीकांचे नुकसान झाले असून, शासनाकडून त्यांना पीक विमा योजनेचे सहाय्य मिळावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सचिवांकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.


प्रत्येक वर्षी मच्छीमारांकडून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी सातत्याने केली जाते. या मागणीचा फक्त विचार केला जातो, परंतु कोळी महिलांना कसलेच आर्थिक सहाय्य दिले जात नाही.


हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या कोळी महिलांना आपला उदरनिर्वाह स्वाभिमानाने करण्यासाठी शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या पीक विमा योजनेचे अर्थ सहाय्य देण्याची मागणी केल्याची माहिती तांडेल यांनी दिली. सुकी मासळीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिला बंदरातून मासळी विकत घेऊन ते त्यांच्या गावातील हद्दीत असलेल्या सामूहिक जागेत मासळी सुकविण्याचा काम करत असतात. कोळी महिलासुद्धा सुक्या मासळीची लागवड करतात.


सूर्याच्या प्रकाशावर या मासळींना सुकविण्याची नैसर्गिक प्रक्रिया असून, अवकाळी पावसामुळे ही लागवड नष्ट झाली, असे समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५