हनिमूनला गेलेल्या बेपत्ता जोडप्याचं गूढ अखेर उलगडलं! सोनमनेच काढला पतीचा काटा

शिलाँग: मेघालयातील शिलाँग इथं हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ अखेर उलगडलं आहे. शिलाँगमध्ये राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह डोंगरावर आढळला होता. तर त्याची पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता झाली होती. मात्र आता सोनम देखील सापडली आहे.


राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे इंदूरचे नवविवाहित दाम्पत्य शिलाँग इथं हनिमूनसाठी गेले असता, काही दिवस बेपता होते. दरम्यान पोलिस तपासणीत काही दिवसांपूर्वी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला खरा, पण सोनम अद्याप बेपत्ताच होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला होता.  ज्यात त्यांना यश आले असून, पत्नी सोनम रघुवंशीसुद्धा पोलिसांना  सापडली आहे. परंतु, तिच्यासोबत आणखीन एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.



सोनमनेच केली पती राजा रघुवंशीची हत्या


या प्रकरणात स्वतः सोनमनेच पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून अटक केली आहे. गाझीपूरचे अतिरिक्त एसपी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान या प्रकरणात मेघालयच्या डीजीपींनी असंही म्हटलंय की राजाची पत्नीच कथितपणे या हत्या प्रकरणात सहभागी होती.



सोनम व्यतिरिक्त इतर तीन आरोपीदेखील मध्य प्रदेशातील आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून महत्त्वाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिलं, ‘राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांनी अवघ्या सात दिवसांत मोठं यश मिळवलं आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर एका महिला आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे.’ या प्रकरणी पोलिसांची शोध मोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. या जलद कारवाईबद्दल संगमा यांनी मेघालय पोलिसांचं कौतुकही केलं.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन