व्याजदर कपातीमुळे शेअर बाजार तेजीत...

डॉ. सर्वेश सुहास सोमण


गेल्या अनेक दिवस तेजीत असणारा भारतीय शेअर बाजार या आठवड्यात देखील सकारात्मक बंद झाला. या आठवड्यात सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते द्वैमासिक पतधोरणाकडे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी सकाळी १० वाजता रेपो रेट जाहीर केले. त्यानुसार, सलग तिसऱ्यावेळी व्याजदरात कपात केली. ५६ महिन्यानंतर ही तिसरी कपात दिसून आली. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जासह इतर कर्जावरील व्याजदरात मोठी कपात झाली. त्याचा फायदा आता रिअल इस्टेट आणि वाहन बाजाराला होईल. गेल्या काही दिवसांपासून हे क्षेत्र मंदीशी सामना करत होते. शुक्रवारी रिझर्व बँकेने आपले द्विमासिक पतधोरण जाहीर केले. रिझर्व बँक पतधोरण निश्चिती समितीने “रेपो दरात”०.५० टक्क्यांची कपात केली. तो आता ५.५ टक्क्यावर आला आहे.


मी यापूर्वीच्या मागील पतधोरणानंतरच्या लेखात रेपो दर, रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय हे सांगितलेले होते. रिझर्व बँक ही बँकांना जे कर्ज देते आणि त्या दिलेल्या कर्जावर जे व्याजदर लावले जातात त्याला “रेपो दर” असे म्हणतात. बँका रिझर्व बँकेकडे ज्या ठेवी ठेवतात आणि बँकांनी ठेवलेल्या ठेवींवर बँकाना जो परतावा मिळतो त्याला “रिव्हर्स रेपो दर” असे म्हणतात. या पतधोरणानंतर निर्देशांकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामध्ये बँक क्षेत्रातील शेअर्सनी उसळी घेतली.


या गुरुवारच्या सत्रात निर्देशांकात झालेल्या वाढीला बँकानी मोठ्या प्रमाणात हातभार लावला. पतधोरणानंतर बँकनिफ्टी मध्ये देखील मोठी वाढ झाली. सरकारी रोख्यांमध्ये बँकांनी केलेल्या गुंतवणुकीवर दिवसाला रिझर्व बँकेकडून दिला जाणारा व्याजदर म्हणजे “एमएसएफ” अर्थात “मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलीटी” तो ५.७५ टक्के इतका राहिला.


पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांक निफ्टीची दिशा आणि गती तेजीची असून २४७०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत ही तेजी कायम राहील ज्यामध्ये आज २५००० ला असणारा निफ्टी २५१५० ते २५२०० पर्यंत मजल मारणे अपेक्षित आहे. त्यामुळे गती आणि दिशा ओळखून त्यानुसार व्यवहार करणे अपेक्षित आहे.


(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)


samrajyainvestments@gmail.com

Comments
Add Comment

Share Market : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारावर दबाव; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण

नवी दिल्ली : आज सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतारामुळे देशांतर्गत शेअर बाजार दबावाखाली राहिला. व्यवहारांची

रुपयात घसरण; मद्यपींमध्ये चिंता

महेश देशपांडे मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जगात सर्वत्र जाणवत आहे. तेल हा जगाच्या

पगारातून जास्त पीएफ कापला जाणार? नवीन नियमांमुळे वेतन रचनेत झाले मोठे बदल

मुंबई : १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन कर आणि श्रम नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठे बदल

Volkswagen Taigun Facelift : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ९ एप्रिलला होणार लॉन्च

मुंबई : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ही एसयूव्ही भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार असून कंपनीने तिची लॉन्च डेट ९

Maruti Suzuki : मार्च महिन्यात मारुती सुझुकीच्या विक्रीत वाढ; 2.25 लाख युनिट्सचा टप्पा पार

मुंबई : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मार्च 2026 महिन्यात विक्रीत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे.

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती १०९ डॉलरच्या पुढे

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तीव्र चढ-उतार होत आहेत.