Sacheerome Limited IPO: सचिरोम कंपनीचा आयपीओ आजपासून खुला आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांचा 'इतक्या' टक्क्याने समाधानकारक प्रतिसाद

प्रतिनिधी: आज सचिरोम लिमिटेड (Sacheerome Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आजपासून खुला झाला आहे. ९ ते ११ जून कालावधीत हा आयपीओ चालू राहणार असून एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात सूचीबद्ध (Listed)  होणार आहे. या कंपनीच्या आयपीओतील गुंतवणूकीत सर्वसामान्यांनी समाधानकारक प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. यावेळी आयपीओतील एकूण सबस्क्रिप्शन २.३५ पटीने मिळाले आहे.आयपीओतील माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्या आयपीओतील एकूण वाट्यापैकी ५.२२ टक्के हिस्सा गुंतवणूकदारांनी खरेदी केलेला आहे तर विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors NII) ने आपल्या वाट्यातील ३.८९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Buyers QIB) यांनी ९६ टक्के वाटा खरेदी केला.


एक्सचेंजमधील माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) ने आपल्या ७४.५१ लाख समभागातपैकी २०.१ लाख समभाग खरेदी केले आहेत. त्यामुळेच किरकोळ गुंतवणूकदारांनी तुलनात्मकदृष्ट्या समाधानकारक प्रतिसाद दिला. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २० लाखातील समभागासाठी बोली लावली. त्यामुळे ८.६१ लाख समभागांच्या तुलनेत सव्वादोन पट सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले आहे. आयपीओ तज्ञांच्या मते ग्रे बाजारात समभागांच्या मूळ किंमत (Issue Price) पेक्षा २९ टक्क्यांनी प्रतिसाद या समभागांना मिळाला आहे. या आयपीओचा प्राईज बँड (Price Band) ९६ ते १०२ रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी ११५२०० रूपयांची गुंतवणूक या आयपीओसाठी करावी लागणार आहे.GYR Capital Advisors, MUFG Intime India (Link Intime) या कंपन्या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहेत. १९९२ साली ही कंपनी स्थापन झाली होती.


कंपनीच्या महसूलात आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील ८६.४० तुलनेत मार्च २०२५ मध्ये १०८.१३ कोटींचा महसूल (Revenue) मिळाला होता. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) मध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील १०.६७ कोटींच्या तुलनेत वाढ होत १५.९८ कोटींचा करोत्तर नफा प्राप्त झाला होता. सचीरोम कंपनी सुगंधी द्रव्ये व फ्लेवर्स डिजाइन या प्रकारचे  उत्पादन घेते. कंपनी या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर नवीन प्रकल्प स्थापन करण्यासाठी व दैनंदिन कामकाजासाठी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र