Rapido News: रॅपिड झोमॅटो व स्विगीला थेट टक्कर ! कंपनी झोमॅट स्विगीची मक्तेदारी 'अशी' संपवणार

  109

प्रतिनिधी: रॅपिडो कंपनीने आता झोमॅटो (Zomato),स्विगी (Swiggy) या आपल्या स्पर्धक फूड डिलिव्हरी व्यासपीठांना (Food Delivery Aggregators) कमिशनवर चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रॅपिडो कंपनीने आपल्या भविष्यातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी व मूबलक नफा कमावण्यासाठी या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रॅपिडोने आपल्या फूड डिलिव्हरी ऑर्डर्सवर संबंधित आपल्या रेस्टॉरंट भागीदारांकडून केवळ ८-१५ टक्के कमिशन घेण्याचे ठरविले आहे. झोमॅटो व स्विगी पारंपारिक पद्धतीने तब्बल १६-३० टक्के कमिशन आकारणी आपल्या भागीदारांकडून करते.

यामुळे भागीदारांना मिळणाऱ्या नफ्यात मोठ्या स्पर्धात्मक वातावरणात तोंड देताना घट होत आहे. तसेच रॅपिडोने कंपनीला गेल्या काही आर्थिक वर्षात निव्वळ (Gross) व करोत्तर नफा (Profit after tax) यासाठी संघर्ष करावा लागला होता. या पारंपरिक कंपन्यांच्या मोठ्या कमिशन आकारणीमुळे ग्राहकांना देखील वाढलेल्या किंमतीचा फटका बसतो.

या गोष्टीलाच आवर घालण्यासाठी रॅपिडोने लहान लहान रेस्टॉरंटशी भागीदारी करून किफायतशीर दरात फूड डिलिव्हरी करण्याचे ठरवले आहे. विशेषतः नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) ची भागिदारी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. त्यामुळे आता रॅपिडो आता ८ ते १५ टक्के कमिशन आकारणी करणार आहे. जशी ऑर्डर असेल त्या हिशोबाने ही कमिशन आकारणी रॅपिडो कंपनी करेल. साधारणतः कंपनी ४०० रूपयांच्या खालच्या ऑर्डरला २५ रुपये तर त्याहून अधिक रक्कमेची ऑर्डर असल्यास ५० रुपये कमिशन आकारणी करणार आहे. जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला या नव्या व्यावसायिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.

यापूर्वी अनेक कंपन्या या व्यवसायात आल्या होत्या. मात्र एखादा अपवाद वगळता या कंपन्या विशेष नफ्यात नाहीत. किंबहुना अनेक कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले. उदाहरणार्थ ओला कंपनीच्या ओला कॅफे कंपनीला आर्थिक नुकसान झाले होते. ऊबर इट्स (Uber Eats) ने तीन वर्षांतच आपला गाशा गुंडाळून आपला व्यवसाय २०२० मध्ये झोमॅटोला विकला होता.

आणि राहिलेल्या व्यवसायात झोमॅटो व स्विगीची डयुओपोली (Duopoly) म्हणजेच मक्तेदारी आहे. मार्केट अहवालानुसार जून २०२५ पर्यंत झोमॅटो कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १.९५ ट्रिलियन रूपये होते तर स्विगी कंपनीचे बाजार भांडवल ९३३.७५ अब्ज रूपये होते.अलिकडच्या काही महिन्यांत अनेक लहान रेस्टॉरंट मालकांनी झोमॅटो आणि स्विगीकडून आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या नव्या व्यवसाय पद्धतीचा रॅपिडो कंपनीला किती फायदा होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्राहकांना आता थेट रॅपिडो व्यासपीठावरून खाद्यपदार्थ मागवता येणार आहेत.

ग्राहक रॅपिडो ॲपद्वारे ऑर्डर देऊ शकतील, जिथे रेस्टॉरंट्स सूचीबद्ध असतील, ज्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या अतिरिक्त किमतीच्या मॉडेल्सना पर्याय म्हणून लहान आस्थापनांना पर्याय उपलब्ध होईल.यामुळे विशेषतः लहान रेस्टॉरंट्सना मदत होईल.' असे चर्चेत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
Comments
Add Comment

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना