Mumbai Local Train Accident : महत्त्वाची अपडेट...अपघातात लोकल ट्रेनमधून खाली पडून 'इतके' जण जखमी, मृतांची ओळख पटली

  142

मुंबई : आज (सोमवार) सकाळी ९.२०च्या वाजताच्या सुमारास कसारा ते सीएसएमटी या धावत्या फास्ट लोकल ट्रेनमधून जवळपास दहाहून अधिक प्रवासी खाली पडले. अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील दोन लोकल ट्रेन्स आजुबाजूच्या रेल्वे ट्रॅकवरुन जात असताना बाहेर लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून अनेक प्रवासी चालत्या ट्रेनमधून (Train Accident) खाली ट्रॅकवर पडले. ट्रेनचा वेग जास्त असल्यामुळे हे प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना काहीवेळापूर्वी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.



मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे



  • मच्छींद्र मधुकर गोतरणे, वय-३१ (पोलीस कॉन्स्टेबल)

  • मयूर शाह (५० )

  • राहुल संतोष गुप्ता (२८ ) रा. दिवा,

  • सरोज केतन (२३ ) रा. उल्हासनगर


जखमी व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे



  • मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

  • स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

  • श्री. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)

  • आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)

  • तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)

  • मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

  • प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

  • रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

  • अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा

मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना