Gold Silver Rate: गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घट चांदीच्या दरात मात्र वाढ 'ही' आहेत कारणे

मुंबई : आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. सतत चार दिवस सातत्यपूर्ण सोन्याच्या दरात भाववाढ झाल्यानंतर शनिवारी सोन्याच्या दरात घट झाली होती. आज तोच ट्रेंड पुन्हा राहत सराफा बाजारात सोन्यात घट दिसून आली आहे. ' गुड रिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,सोन्याच्या २४ कॅरेट प्रति तोळे किंमतीत २८ रूपयाने घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर प्रति ग्रॅम ९७६९ रूपये झाले आहेत तर प्रति तोळा किंमत ९७,६९० रुपये पातळीवर पोहोचली आहे.


२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत २५ रूपयांनी घसरत ८९५५ रुपयावर पोहोचली आहे तर प्रति तोळा किंमत ८९,५५० रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत २१ रूपयांनी घसरून ८३२७ रूपयांवर पोहोचली आहे तर प्रति तोळा किंमत ७३२७० रुपयांवर पोहोचली आहे.


मुंबईसह बहुतांश सगळ्या महानगरात २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९७६९ रूपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीत सुधारणा होत असताना बाजारातील रूपयांची किंमत वधारतानाच सोन्याच्या मागणीत सतत चढत्या दराने घट होत होती. त्याची परिणिती म्हणून यापूर्वी नफा बुकिंग म्हणून सोन्याच्या संचयात होणारी वाढही कमी झाली. चीन अमेरिका यांच्यातील व्यापार मतभेदात काही अंशी घट झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आशियाई शेअर बाजारात पाहायला मिळाला होता.


एमसीएक्सवर सोन्याचा निर्देशांकात ०.५१% घट झाली आहे. त्यामुळे एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याची दर पातळीही कमी होत ९६,५३७.०० पातळीवर पोहोचली आहे. युएस गोल्ड फ्युचर (US Gold Future) निर्देशांकात ०.२३ टक्क्याने घसरण दुपारपर्यंत झाली होती.


चांदीच्या दरात किरकोळ वाढ कायम !


शनिवार प्रमाणे चांदीच्या दरात किरकोळ वाढ कायम आहे. प्रति ग्रॅम चांदीची किंमत १०८ रूपयांवर तर एक किलो चांदीची किंमत १००० रूपयांनी वाढत १,०८,००० रूपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या एमसीएक्स निर्देशांकात ०.०७ टक्क्यांनी वाढ होत किंमत पातळी १,०५,५३२.०० रुपयांवर पोहोचली. चांदीच्या मागणीत सोन्याच्या तुलनेत वाढ झाल्याने बाजारात तुलनात्मकदृष्ट्या चांदीसाठी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. परिणामी चांदीत आजही वाढ कायम आहे.

Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील