रेल्वेत विसरलेले सोन्याचे दागिने मिळाले!

मुंबई : एका महिलेची लोकल ट्रेनमध्ये राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग वडाळा रेल्वे पोलिसांनी शोधून परत मिळवून दिली. त्या बॅगेत ४ लाखांचे सोन्याचे दागिने होते. मात्र रेल्वेच्या मदत क्रमांकावर संपर्क साधून लवकर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


साताऱ्यात राहणाऱ्या प्राजक्ता बावधाने यांनी कुर्ल्यावरून पनवेलला जाणारी ट्रेन पकडली. त्यांचा भाऊ उदय शिंदे हा पुरूषांच्या डब्यात होता तर प्राजक्ता या मुलासह महिलांच्या प्रथम श्रेणी डब्यात होत्या. सायंकाळी ६ वाजता ते मानसरोवर रेल्वे स्थानकात उतरले. त्यावेळी गडबडीत बॅग ट्रेनमध्येच विसरल्याचे प्राजक्ता यांच्या लक्षात आले. दुसऱ्या डब्यातून उतरलेला त्यांचा भाऊ उदय शिंदे याला त्यांनी हा प्रकार सांगितला. उदय शिंदे यांनी तात्काळ रेल्वेच्या हेल्पलाईनला संपर्क साधण्यास सुरवात केली. मात्र कुणी प्रतिसाद दिला नाही.


वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जाधव हे डॉकयार्ड रेल्वे स्थानकात होते. त्यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी ट्रेनमध्ये तपास केला. सुदैवाने ती बॅंग ट्रेनमधील रॅकवर सुरक्षित होती. त्या बॅगेतील दागिन्यांची पडताळणी करण्यात आली आणि प्राजक्ता बावधने यांच्याकडे बॅग सुपूर्द करण्यात आली, अशी माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी दिली.

Comments
Add Comment

फूड डिलिव्हरी बॉय संपावर, थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात ?

मुंबई : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आदी अॅपबेस्ड फूड ऑर्डर पूर्ण करणाऱ्या

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती