Sadaiva Tumchi Zee Marathi : एक नवा अध्याय! 'सदैव तुमची झी मराठी' – एक नवं रूप, नव्या नात्यांसह

मुंबई : ‘मी मराठी झी मराठी’ आपली नवीन ओळख आणि एक नवा अध्याय सुरू करत आहे. गेली २६ वर्ष महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवणारी, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ‘मी मराठी झी मराठी’ असं अभिमानाने म्हणत महाराष्ट्र आणि देशविदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आपला एक वेगळा ठसा उमटवला. 'सदैव तुमची झी मराठी' या ओळींमागे आहे एक साधा पण खोलवर जाणा-या भावनेचा विचार. “सदैव तुमची” ही भावना आहे आपलेपणाची, एकत्रतेची आणि छोट्या-छोट्या क्षणांमधून निर्माण होणाऱ्या मोठ्या भावनिक बंधांची. झी मराठी आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती, भावना, आणि दैनंदिन जीवनातल्या सत्य घटनांना सिनेमॅटिक रूप देते.



या संदर्भात झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर व्ही. आर. हेमा म्हणाल्या, “सदैव तुमची झी मराठी हे वाक्यच आपल्या नात्यांमधील भावनिक गुंतवणूक दाखवते. इथं एकमेकांच्या सुखदुःखात खांदा देऊन उभं राहणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. झी मराठी ही केवळ एक वाहिनी नाही, तर घराघरातली आपुलकीची एक भावना आहे. आता प्रेक्षकांसोबतचे नातं आणखी दृढ करण्यासाठी *'झी मराठी' एका नवीन रूपात नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहे. या प्रवासात नव्याने सुरु झालेली 'देवमाणूस' आणि लवकरच सुरु होणारी 'कमळी' ह्या मालिका प्रेक्षकांना नक्कीच भावतील.





पुन्हा नव्याने सुरु होणारा 'चला हवा येऊ द्या' हा कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. हे आणि असे अनेक नवनवीन सरप्राइझेस येत्या वर्षात झी मराठी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे.” झी मराठी ही लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनली आहे. इथे झी मराठी पाहिली जातेच, पण ती अनुभवलीही जाते. या नव्या प्रवासात आपली साथ हेच आमचं बळ आहे. या माध्यमातून झी मराठीने आपल्या प्रेक्षकांसोबतचं नातं आणखी घट्ट केलं आहे आणि एक असा सांस्कृतिक क्षण निर्माण केला आहे, जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल.

Comments
Add Comment

फुलवंतीला झालं एक वर्ष; प्राजक्ता काय म्हणतेय पहा...

मुंबई : उत्कृष्ट कथानक असलेला फुलवंती हा संगीतबद्ध चित्रपट २०२४ मध्ये आला होता. आज त्याला एक वर्ष पूर्ण झालं.

कांतारा चॅप्टर १ जगभरात धडाकेबाज ठरला! अवतार आणि टायटॅनिकलाही मागे टाकत ऋषभ शेट्टीने रचला इतिहास

दक्षिणेतील अभिनेता ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट सर्व स्तरातून प्रचंड प्रेम मिळवत आहे. त्याच्या

"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक

'बिग बी' यांनी ८३ व्या वाढदिवसाला स्वतःला दिली खास भेट !

मुंबई : बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ८३व्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला एक खास भेट दिली आहे.

कल्कीच्या सिक्वेलमध्ये आलिया दिसणार? चर्चांना उधाण

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, बॉलिवूड ग्लॅम दीपिका पादुकोण आणि बिग बी यांच्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाने २०२४

आमंत्रण नसतानाही बिग बींच्या बर्थडेला 'ती' आली अन् बाथरूममध्ये लपली!

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी