‘मास्क घातलेल्या लोकांना अटक करा’

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या आदेशामुळे खळबळ!


वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त निर्णय घेतला आहे. लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या आंदोलकांच्या विरोधात त्यांनी मास्क घालणाऱ्या व्यक्तींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अमेरिकन जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, मानवाधिकार संघटनांनी या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.


लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान अनेक आंदोलक मास्क घालून सहभागी झाले होते. या मास्कमुळे आंदोलकांची ओळख पटवणे कठीण जात असल्याचे कारण पुढे करत ट्रम्प प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले. याआधी, ट्रम्प यांनी २००० नॅशनल गार्ड सैनिकांना रस्त्यांवर उतरवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या निर्णयाचा नागरिकांनी तीव्र विरोध केला आणि निदर्शने अधिक तीव्र झाली.



या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार झाल्याचेही समोर आले आहे. त्याचा आधार घेत ट्रम्प यांनी हे आदेश सोशल मीडियावरून दिले. त्यांनी सांगितले की, "लॉस एंजेलिसवर बेकायदेशीर परदेशी नागरिक आणि गुन्हेगारांनी आक्रमण केले आहे. हे लोक आमच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करत आहेत आणि हद्दपारी मोहिम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत."


ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे देशात फूट पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की, कायदेशीररित्या देशात राहणाऱ्यांनाही या निर्णयाचा त्रास होत आहे. आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याची भाषा वापरणाऱ्या ट्रम्प यांनी, जर कोणी सैनिकांवर थुंकले तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या