एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय


वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील तणाव चांगलाच वाढला आहे. रशियातील खासदार दिमित्री नोविकोव्ह यांनी मस्क हे रशियात राजकीय आश्रय घेऊ शकतात असे सूचक विधान केले आहे.


ट्रम्प आणि मस्क यांच्या उघडपणे आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट ड्यूमा कमिटी ऑन इंटरनॅशलम अफेअर्स (कम्युनिस्ट पार्टी ऑफ द रशियन फेडरेशन) चे पहिले उपाध्यक्ष असलेल्या नोविकोव्ह यांनी हे विधान केले आहे.


रशिया एडवर्ड स्नोडेनप्रमाणे एलॉन मस्क यांना राजकीय आश्रय देईल का? असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला होता. “मला वाटतं की मस्क यांचा गेम पूर्णपणे वेगळा असून त्यांना कोणत्याही राजकीय आश्रयाची आवश्यकता भासणार नाही, जरी त्यांना तशी गरज वाटली तर नक्कीच रशिया ते देईल,” असे उत्तर नोविकोव्ह यांनी दिले.


त्यांनी असेही नमूद केले की मस्क यांनी गेल्या काही वर्षांत एक प्रकारचा राजकीय संवाद निर्माण केला आहे ज्यामुळे वैयक्तिक मतभेद हे वेगळ्या प्रकारचे मतभेद राहतील.


या घडीला, तीन वर्षांत डेमोक्रॅटीक पक्ष व्हाईट हाऊसमध्ये परत यावा हे मस्क यांच्यासाठी आवश्यक आहे असे मला वाटत नाही आणि तेही त्याचे स्वागत करण्यासाठी तयार नाहीत. म्हणून सध्या यामध्ये काही डावपेचांचे फरक आहेत आणि काही धोरणात्मक गोष्टी आहेत आणि त्यांचे ते पालन करत राहतील, असे मला वाटते, असेही नोविकोव्ह पुढे बोलताना म्हणाले.


मस्क यांच्यावर टीका


व्हाईट हाऊसचे माजी रणनितीकार स्टीव्ह बॅन्नन यांनी मस्क हे एक बेकायदेशीर एलियन आहेत, ज्यांना अमेरिकेतून हद्दपार केले पाहिजे. तसेच बॅन्नन यांनी अमेरिकन सरकारने अब्जाधीश एलॉन मस्क यांची कंपनी स्पेएक्स हे देखील जप्त केली पाहिजे असेही म्हटले होते. या विधानानंतर दिमित्री नोविकोव्ह यांनी यावर भाष्य केले.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी