शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय


मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासणे, दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले आहेत.


शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी व सायंकाळी अशी दोने वेळेस चाचणी होणे गरजेचे आहे. अनधिकृत व्यक्ती बसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तसेच खासगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच, पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी, चालकांची पार्श्वभूमी, तसेच बेपर्वा ड्रायव्हिंग आणि भूतकाळातील अपघाताच्या घटनांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांसाठी खासगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशिलांची माहिती देणे आवश्यक आहे. बसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, दर सहा महिन्यांनी बसची तांत्रिक तपासणी करून आरटीओकडून प्रमाणपत्र घेणे, अशा विविध उपाययोजनांची अमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांनी शौचालये, परिसर आणि इतर संवेदनशील ठिकाणी देखरेख ठेवावी.


शाळा सुटल्यानंतर कोणीही विद्यार्थी शाळेत राहणार नाही याची शाळांनी खात्री करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
मुंबईत सध्या सुमारे सहा हजार शालेय बस कार्यरत आहेत.


शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित झाल्याचे स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. मुख्याध्यापकांची जबाबदारी निश्चित झाली असून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या वेळी सुरक्षेची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असेल, असेही ते म्हणाले.


सरकारने सर्व शाळांना एक अलर्ट सिस्टम स्थापित करण्यास सांगितले आहे. जेणेकरून जर एखादा मुलगा शाळेतून हरवला किंवा त्याच्या नियुक्त केलेल्या बसमध्ये चढला नाही तर त्यांना तत्काळ सूचना मिळतील. राज्य सरकारने चालकांची माहिती तपासण्यासाठी जिल्हा समिती नियुक्त करावी. काही चालक इतर राज्यांतील असतात आणि त्यांची पोलीस पडताळणी करणे कठीण असते. आरटीओ आणि पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये शाळांना मदत करावी, असे स्कूल प्रिन्सिपल्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या