वैयक्तिक आकसापोटीच कावेसर तलाव उद्यानाच्या सुशोभीकरणाला विरोध

हिरानंदानी इस्टेट परिसरातील रहिवाशांचा दावां


ठाणे :कावेसर तलाव उद्यानाचे सुशोभीकरण ही हिरानंदानी इस्टेट आणि परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. मात्र गेली १० वर्षं विभागातील कोणतीच विकासकामे न केलेल्या एका राजकीय पुढाऱ्याने काही नागरिकांना हाताशी धरुन रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे. याच विभागातील लोकप्रतिनिधिनी सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहत सुशोभीकरण कामाचे स्वागत केले आहे. उद्यानाचे सुशोभीकरण झाल्यास तलावाचे सौंदर्य खुलेल आणि सुरक्षितता अधिक वाढेल, असा विश्वास येथील रहिवाशांनी आज पत्रकार परिषद घेत व्यक्त केला.


हिरानंदानी इस्टेटमध्ये हिरानंदानी सीनिअर सिटीझन फाऊंडेशन, राष्ट्रीय योग ध्यान केंद्र, क्लब आणि सामाजिक संस्था आहेत. त्यांनी ठाणे महापालिकेचे सार्वजनिक उद्यान जे कावेसर तलावाच्या शेजारी आहे त्याचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली होती. त्या अानुषंगाने खासदार नरेश म्हस्के यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे व ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उद्यानाचे सुशोभीकरण होणार आहे.


हिरानंदानी इस्टेट मधील रहिवाशांच्या विनंतीवरुनच ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण, प्रदुषण नियंत्रण विभागाने एकत्र बसून उद्यान प्रकल्प आराखडा बनवला. मात्र आपली पोळी भाजण्यासाठी सुशोभीकरणाला विरोध होत आहे. ‘कावेसर लेक क्राँकिटायझेशन’ असा ते अपप्रचार करत आहेत. वास्तविक ‘कावेसर गार्डन ब्युटिफिकेशन' असे वास्तव आहे.


जर नागरिकांच्या काही सूचना असतील तर त्याचे स्वागतच आहे असे प्रवीण नागरे म्हणाले. गेली अनेक वर्षं तलावाची आम्हीच देखरेख करत आलो आहोत. येथील तलावातून उन्हाळ्यात काही जण पाण्याचा उपसा करायचे. त्याला आम्ही प्रतिबंध घातला. त्यामुळेच हा पुढारी आता विकासाला विरोध करत आहे. गैरसमज पसरवून हा पुढारी रहिवाशांची माथी भडकवित असल्याचे प्रवीण नागरेयांनी सांगितले.


सुशोभीकरण करताना कावेसर तलावात कोणतीही छेडछाड केली जाणार नाही. जैवविविधतेला कोणतीही बाधा न आणता सुशोभीकरण होणार आहे. जैवविविधता राखणे आमचे कर्तव्यच आहे. जागतिक पर्यावरण दिनी आम्ही तलावाच्या किनारी वृक्षारोपण करणार होतो, त्यालाही या पुढाऱ्याने विरोध केला. याच पुढाऱ्याने ब्रह्मांड तलावाचे सुशोभीकरण करताना अर्धा तलाव काँक्रीटने गिळंकृत केला. तेव्हा या पुढाऱ्याविरोधात या पर्यावरणप्रेमींनी विरोध का केला नाही? असा सवाल प्रवीण नागरे यांनी उपस्थित केला आहे.


सदर पुढाऱ्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने प्रकल्पाला विरोध सुरू आहे, असे हिरानंदानी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष धर्मप्रकाश त्रिपाठी म्हणाले. तर हिरानंदानी इस्टेटमध्ये मी अनेक वर्ष राहतो. येथे तलाव आहे हेच आम्हाला माहिती नव्हते. प्रवीण नागरे यांच्या टीमने येथे मेहनत घेऊन तलाव अणि उद्यान नावारूपास आणला. तेव्हा कोणी पुढे आले नव्हते अशी टीका रोडाज गृहसंकुलाचे अध्यक्ष बी.जे.राव यांनी केली.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र