सिडनीमध्ये मुंबईचा वडा-पाव

  89

अजित राऊत


आम्ही ऑस्ट्रेलियात अनेक प्रेक्षणीय ठिकाणी फिरलो. त्यातील प्रमुख म्हणजे सुप्रसिद्ध ऑपेरा हाऊस, तसेच उंच असा हर्बर ब्रिज, सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्यावरील बोंडी बिच, तसेच भले मोठे पॅरामॅटा गार्डन. या प्रसिद्ध ठिकाणी फेरफटका मारताना अनेकदा खूप उत्साह वाटत होता. फिरून अनेकदा खायची इच्छा झाली. पण खायचे तर खायचे काय? त्याची चव कशी असेल, असे अनेक प्रश्न आमच्या मनात थैमान घालीत होते. चिकनचे पदार्थ, बेकरीचे अनेक प्रकार, बीफ, भाजून तयार केलेले लटकवलेले बदक, असे अनेक कच्चे तळलेले पदार्थ पाहण्यात आले. पण भारतीय मन त्याकडे ओढ घेतच नव्हते.


मी माझ्या पत्नीसह अंकिता, आदित्य या मुलांकडे सिडनी येथे एका महिन्याकरिता फिरायला गेलो होतो. आमच्या मुलांनी ‘मुंबईचा वडापाव’ इथे मिळतो असे सांगितल्यावर तो खाण्यासाठी मन अतिशय आतुर झाले.



वडापाव हे तर आम्हा मुंबईकरांचे मुख्य आकर्षण. देशापासून इतक्या लांब आल्यावर वडापाव मिळतोय म्हटल्यावर ही संधी कोण सोडणार. आम्ही त्या हॉटेलची पाटी वाचताच मन भरून आले. आपला मुंबईचा वडापाव ऑस्ट्रेलियात असे हॉटेल असेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण वास्तव मुलांनी समोर ठेवले होते. आम्ही सर्वजण ‘मुंबईचा वडापाव’ या हॉटेलमध्ये दाखल झालो. माझ्या मुलीने आमची हॉटेल मालकाशी ओळख करून दिली.


मी खासदार, श्री. नारायण राणे यांच्या दै. ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये काम करत असल्याचे सांगताच त्यांची उत्सुकता वाढली. त्यांनी आम्हाला महाराष्ट्रीय पदार्थ वडापावपासून बटाटा वडा, कांदा भजी, साबुदाणा वडा, खास तळलेल्या कुरुकुरीत मिरच्या, मिसळ, पाणीपुरी खाण्यास सांगितले . आम्ही तिथेच नाष्टा केला. प्रत्येक पदार्थांचा आस्वाद काही विशेषच होता. जसा मुंबईचा कीर्ती कॉलेजचा अशोकचा वडापाव, मामा काणे यांचा वडा, श्रीकृष्णचा वडा, लाडू सम्राट, मंगेशचा वडा हे माहीत होते; परंतु सिडनी येथील श्री. वैभवी दिलीप साळवी आणि श्री. युवराज चावडा यांच्या हॉटेलची चव तशीच्या तशीच होती. त्यामुळे अपूर्व असे समाधान लाभले व आमची भूक मनसोक्त भागली. ऑस्ट्रेलियाची फेरी करणारा कोणीही महाराष्ट्रीय सिडनी येथे जाईल, तर त्यांने साळवी कुटुंबीयांनी अतिशय मेहनतीने उभ्या केलेल्या ‘मुंबईचा वडापाव’ या मराठी माणसांच्या हॉटेलात भेट द्यावी आणि बुजलेली भूक शमवावी असे सूचवावे वाटते. आपला मुंबईचा वडापाव एका दहिसर, परबतनगरकराने सातासमुद्रापलीकडे नेला आहे म्हणूनच श्री. साळवी कुटुंबीयांचे आम्हाला अप्रूप वाटते.

Comments
Add Comment

वृद्धाश्रम...

कथा : रमेश तांबे सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या

सूर्य गार भागात का जात नाही ?

कथा : प्रा. देवबा पाटील दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता

खेड्याकडे चला

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आईच्या पेन्शन बँकेत तिचे ‘केवायसी’ करायचे म्हणून मी इंडियन बँकेत गेले होते.

कालाय तस्मै नम:

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर भारतीय तत्त्वज्ञानात ‘काल’ या संकल्पनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

पाऊस

कथा : रमेश तांबे एकदा काय झाले काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरून आले वारा सुटला सोसाट्याचा उडवत पाचोळा

झोप

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शरीर तसेच मनाच्या विश्रांतीची ‘झोप’ ही नैसर्गिक अवस्था असते. झोप आपल्या शरीराला