ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे. दरवर्षी प्रस्थान सोहळा हा दुपारी चार ते सायंकाळी सहाच्या दरम्यान होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी प्रस्थान सोहळा गुरुवारी (१९ जून) आल्याने परंपरेप्रमाणे नित्य गुरुवारची माउलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि आरती झाल्याशिवाय पालखीचे प्रस्थान होणार नाही.


वारकऱ्यांना कष्ट होवू नयेत आणि पालखी प्रस्थान सोहळ्यास दिरंगाई होवू नये यासाठी यंदाच्यावेळी नित्य गुरूवारची पालखीची मंदिर प्रदक्षिणा सूर्यास्तानंतर सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान काढली जाईल. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम साडे सातच्या वेळेस होईल. त्यानंतर पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यास दिंड्या देउळवाड्यात घेऊन सुरूवात केली जाणार असल्याने माउलींच्या पादुकांचे प्रस्थान साधारण रात्री आठच्या दरम्यान होणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले.


डॉ. देखणे म्हणाले, ‘‘२० जूनला पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. तत्पूर्वी आळंदीत तीन चार दिवस आधीच दिंड्या, वारकरी, भाविकांची गर्दी शहरात होत असते. दरवर्षी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान साधारण सायंकाळी सहाच्या दरम्यान देउळवाड्यातून होते. मात्र, यंदाच्या वर्षी तिथीनुसार सोहळा गुरुवारी येत आहे. त्यामुळे गुरुवारची नित्याची माउलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा लवकर घेण्यात येत आहे. प्रस्थान उशीर होऊन वारकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान आरती झाल्यानंतर महाद्वारातून दिंड्यांना प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्यासाठी मंदिर प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतर प्रस्थानाचा कार्यक्रम सुरू होईल.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी