बांधकामांचा सुकाळ अन् पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ

आमदार संजय केळकर घेणार अधिकाऱ्यांची झाडाझडती


ठाणे :ठाण्यात एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी पाण्याची पळवा-पळवी सुरू आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. तर वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांतर्गत आमदार संजय केळकर यांनी खोपट येथील भाजपा पक्ष कार्यालयात नागरिकांशी संवाद साधत नागरी समस्या ऐकून घेतल्या. पत्रकारांशी बोलताना केळकर यांनी ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नाराजी व्यक्त केली. ३०-३५ बेकायदा बांधकामांची यादीच प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचे समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. न्यायालयाने कानउघाडणी केल्यावरच कारवाई केली जाते. येत्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून अशा बांधकामांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.


शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोअरही खणलेल्या नाहीत. अशावेळी बांधकामेही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणी पुरवठा केला जात आहे. याकरिता पाण्याची पळवा-पळवी करण्यात येत असल्याने अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोसळले आहे.


सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अधिवेशनात लावून धरल्याने राज्यातील सुमारे ५० हजार कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळाला. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाणीवपूर्वक लाभार्थ्यांना ऑर्डर देण्यात चालढकल होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. अंबरनाथ नगरपालिकेतील ४७ लाभार्थ्यांच्या ऑर्डर काढण्यात येणार आहेत. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ऑर्डर काढण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. ठाणे महापालिकेतील सफाई कामगारांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वांना हा लाभ मिळेपर्यंत मी प्रयत्नशील राहीन, असे केळकर म्हणाले.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून