बिश्नोई टोळीने धमकी दिल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे प्रापर्टी डीलर आणि काँग्रेस नेते अकबर चौधरी यांनी पोलिसांकडे बिश्नोई टोळीच्या दोन जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. बिश्नोई टोळीकडून धमकी आल्याचे अकबर चौधरी सांगत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

गाझियाबादमधील टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पसौंडा गावातील ईदगाह रोडवर अकबर चौधरी राहतात. अकबर चौधरी हे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस अर्थात प्रदेश महासचिव आहेत. अकबर चौधरींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना ६ जून रोजी सकाळी ११ वाजता मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणारा स्वतःला दक्ष चौधरी आणि अनु चौधरी यांचा मित्र सांगत होता. त्याने मी लॉरेंस बिश्नोई टोळीचा सदस्य आहे, असंही सांगितलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली. इन्स्टाग्रामवर शेखर शर्मा नावाच्या व्यक्तीनेही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे अकबर चौधरींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलीस दक्ष चौधरी, अनु चौधरी आणि शेखर शर्मा नावाच्या व्यक्तींना शोधत आहेत. ज्या नंबरवरुन फोन आल्याचे अकबर चौधरी म्हणाले त्या नंबर बाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत