केंद्रीय संस्कृत विद्यापीठातर्फे आजपासून उत्कर्ष महोत्सव

  63

नाशिक : केन्द्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती यांच्या संयुक्त विद्यमाने ८, ९ आणि १० जून रोजी नाशिक मध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्कृत विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ मदनमोहन झा यांनी पत्रकार परिषदेत दिली.


प्रा. निलाभ तिवारी, ब्रह्मदत्त शर्मा, मुकुंद खोचे, स्वागत समितीचे लक्ष्मण सावजी, विश्वास देवकर आदी उपस्थित होते. केन्द्रीय संस्कृत विद्यापीठ संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणारी भारत सरकारची सर्वात मोठी संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून भारतभर १२ कॅम्पस, शेकडो महाविद्यालये आणि हजारो गुरुकुल पाठशाळा कार्यरत आहेत.


नाशिक कॅम्पस मध्ये आयुर्वेद शिक्षणासाठी प्राथमिक ते उच्चस्तरापर्यंत गुरुकुलाची स्थापना केली जाईल. यासोबतच शास्त्र विषयांसोबत विविध व्यावसायिक प्रशिक्षण, पीजी डिप्लोमा कोर्सेस, नवीन अभ्यासक्रम व बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेससाठी संस्कृत माध्यमातून मार्गदर्शन दिले जाईल.



महोत्सवाचे कार्यक्रम


८ जून २०२५ (शनिवार)
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे सकाळी १० वाजता "आगामी १० वर्षांची संस्कृत संवर्धन योजना" यावर देशभरातील संस्कृत विद्यापीठांचे कुलगुरू ,प्रतिनिधी चिंतन करतील.


९ जून २०२५ (रविवार)
स्थळ: गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक
वेळ: सकाळी १० वाजता – सार्वजनिक उद्घाटन
दुपारी २.३० वाजता "संत संमेलन".


१० जून २०२५ (सोमवार)
स्थळ: गुरुदक्षिणा सभागृह वेळ: सकाळी १० वाजता – कुलगुरू पुरस्कार वितरण व पुस्तक लोकार्पण समारंभ



देशात साडेतीन लाख गुरुकुल करणार


भारतीय संस्कृतीत गुरुकुल पद्धत अवलंबली जात होती. त्या काळात १ लाख ४० हजार गुरुकुले होती. परंतु पुढील काळात ही पद्धत संपुष्टात आली आहे. भारतीय संस्कृतीचा विचार पुढे नेण्यासाठी आता पुन्हा एकदा केंद्रशासन गुरुकुल पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करत आहे. आगामी काळात देशभरात साडेतीन लाख गुरुकुल सुरू करणार असल्याचा असल्याची माहिती तिवारी
यांनी दिली.

Comments
Add Comment

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला

इगतपुरीतील तीनलकडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक