घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती


ठाणे: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी घोडबंदर मार्गावर पुढील चार दिवस मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी घोडबंदर मार्गावर पुढील चार दिवस मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. कासारवडवली आणि कापुरबावडी भागात हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे कासारवडवली भागात शुक्रवारी रात्री ११. ५५ वाजता ते शनिवारी सकाळी ५ वाजेपर्यंत आणि कापुरबावडी भागात शनिवार रात्री ११ ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत आणि रविवार रात्री ११ ते सोमवार सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असतील.



कापुरबावडी भागातील बदल


प्रवेश बंद : ठाणे घोडबंदर स्लीप रोडवरुन कापुरबावडी सर्कल मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापुरबावडी सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग : सदरच्या मार्गावरुन जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कापुरबावडी सर्कल येथुन पुला खालुन नळपाडा सिग्नल येथुन उजवीकडे वळण घेऊन, नंदीबाबा चौक, ढोकाळी मार्गे इच्छित स्थळी जातील. सदर मार्गावरुन जाणारी सर्व प्रकारची वाहने ही रवि स्टील नाका येथुन डावे बाजुस वळण घेवुन पोखरण रोड नं.२,गांधी चौक येथून



उजवे बाजुस वळण घेऊन खेवरा सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.


प्रवेश बंद : नळपाडयातुन बाहेर येऊन तत्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नळपाडा पाईप लाईन येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग : सदर मार्गावरुन जाणारे सर्व प्रकारची वाहने नळपाडा पाईप लाईन येथुन यु टर्न घेऊन नळपाडा येथून इच्छित स्थळी जातील. हे वाहतूक बदल शनिवार रात्री ११ ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत आणि रविवार रात्री ११ ते सोमवार सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असतील.




कासारवडवली भागातील वाहतूक बदल


प्रवेश बंद :ठाणे घोडबंदर वाहिनीवर डोंगरीपाडा येथे स्टिल गर्डर चढवितांना घोडबंदर च्या दिशेने जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना पातलीपाडा उड्डाणपुल उतरणीच्या पुढे ‘प्रवेश बंद’ असेल. ही सर्व प्रकारची वाहने पातलीपाडा उड्डाणपूल उतणीच्या पुढे खुला केलेल्या मध्य दुभाजक कटमधून विरुद्ध दिशेने जाऊन वाघबिळ पुला पूर्वी ओपन केलेल्या कट मधून जाउन पुढे मुख्य रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जातील.


प्रवेश बंद : ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना पातलीपाडा पुला लगत स्लीप रोडने हिरानंदनी इस्टेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना पातलीपाडा ब्रिज चढणी जवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग : ठाणे घोडबंदर वाहिनीवरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतूक करतांना हिरानंदनी इस्टेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी पातलीपाडा पुलावरून जाउन वाघबिळ पुला खालुन जातील.


प्रवेश बंद : ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना मानपाडा पुळलगत स्लीप रोडने मानपाडा ब्रिज खाली तसेच टिकुजीनीवाडी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा पूल चढणी जवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग : ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना मानपाडा पुला खाली जाणाऱ्या सर्व वाहनांनी पातलीपाडा पुला खालुन तसेच टिकुजीनीवाडी कडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी मुल्ला बाग मार्गे इच्छित स्थळी जातील. हे वाहतूक बदल शुक्रवारी रात्री ११. ५५ वाजता ते शनिवारी सकाळी ५ वाजेपर्यंत लागू असतील.

Comments
Add Comment

मनसे प्रमुख राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर

ठाणे : उत्तर भारतीयांना उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात एप्रिल २०२२ मध्ये उत्तर सभा घेतली

घोडबंदर रोडवर उद्यापासून वाहतुकीत बदल

ठाणे : घोडबंदर परिसरातील गायमुख रोडची खालावलेली अवस्था लक्षात घेऊन महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून

बदलापूर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

प्रवीण समजीस्कर मृत्यू प्रकरणातील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल  बदलापूर :  सह्याद्री सुपर सपेशालिस्ट

ठाण्यात ११ डिसेंबरपर्यंत दररोज ३० टक्के पाणीकपात

पाइपलाइन फुटल्याने पुरवठा विस्कळीत ठाणे : कळवा फाटा परिसरात महानगर गॅस कंपनीकडून सुरू असलेल्या कामादरम्यान

ठाणे घोडबंदर रोडवर आज वाहतूक कोंडीची शक्यता

दुरुस्तीच्या कामांमुळे जड वाहनांना प्रवेशबंदी ठाणे : ठाण्याचा घोडबंदर रोडवर उद्या (ता. ७) मोठ्या प्रमाणात वाहतूक

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.