मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांची मागणी


नाशिक : मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोल द्यावा लागत आहे. या दुहेरी टोलमधून एकच टोल घेण्यात यावा किंवा घोटी येथे घेतला जाणारा १४० रुपये टोल २५ रुपये करण्यात यावा. किंवा समृद्धी महामार्गावरील घोटी ते ठाण्यापर्यंतची टोलची रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी केंद्रिय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरतर्फे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी केली आहे. सदर पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आली आहे.


समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवार दि. ५ जुन २०२५ रोजी लोकार्पण झाले. इगतपुरी ते आमणे (ठाणे) असा हा ७६ किलोमीटरचा रस्ता आहे. समृध्दी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या ८ तासात पार करता येणार आहे. हा मार्ग जेएनपीटी बंदराला जोडला जाईल तसेच नव्याने होणाऱ्या वाढवण बंदराला हि जोडण्याची योजना आहे. यामुळे महाराष्ट्राच्या एकूण अर्थव्यवस्थेला आणि विशेष करून दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.


महाराष्ट्रामध्ये नाशिक हे वेगाने विकसित होणारे असे शहर आहे. समृध्दी महामार्गाने मुंबईला जाणे हे अवघ्या ३ तासात शक्य होणार आहे. नाशिकहून मोठ्या प्रमाणावर नाशवंत कृषीमाल व इतर उत्पादनांची निर्यात होत असते. या महामार्गामुळे कमी वेळात जेएनपीटी बंदराकडे माल वाहतूक होणार आहे. त्यामुळे वेळ आणि खर्चातील मोठी बचत सर्वांसाठी लाभदायक असणार आहे.


सध्या घोटी येथे टोल भरून जुन्या मार्गाने गोंदे ते वडपे पुढे जाता येते. ती टोलची रक्कम प्रवासी वाहनांसाठी १४० रुपये आहे. तर मालवाहतूक वाहनांसाठी ५०० हुन अधिक रक्कम द्यावी लागते. नवीन समृध्दी महामार्गाने गेल्यास टोलची ८० किलोमीटरसाठी २०० रुपये इतकी रक्कम आहे. तसेच मालवाहतूक वाहनांना ५०० रुपयांहून अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. घोटी टोल नाका ते समृध्दी महामार्ग हे अंतर केवळ ३ -४ किलोमीटर असे आहे. त्यामुळे नाशिकहून समृद्धी मार्गे मुंबई अथवा जेपीटी येथे जायचे असेल तर डबल टोल टॅक्सचा भुर्दंड भरणे हे अन्यायकारक आहे.

Comments
Add Comment

सिंहस्थ कुंभमेळा जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताला अधोरेखित करणार

५,७५७ कोटी ८९ लाख रुपयांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते

नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत गतिमान कारभारासाठी उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

नाशिक : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल

कुंभमेळ्यात मुसलमानांची दुकानं नको! मंत्री नितेश राणेंची ठाम भूमिका

नाशिक: ज्वलंत हिंदुत्वाचे राज्यातले केंद्र नाशिकमध्ये आहे. या नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर

नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदाआरती

नाशिक : भगवा कुर्ता परिधान करुन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गोदावरीची अर्थात

बुरखा घालून १४ वेळा मतदान करण्याला आक्षेप नाही ?

मंत्री नितेश राणे यांचा नाशिकमध्ये विरोधकांना सवाल नाशिक  : विधानसभा निवडणुकीनंतरच विरोधकांकडून मतबंदीचा