युवक ठरला नियोजनशून्य व्यवस्थेचा बळी!

दुसऱ्याची चूक जयेशच्या जीवावर बेतली


विरार: विजेच्या धक्क्याने अर्नाळा येथे मृत्यू झालेल्या जयेश घरत हा केवळ मदतनीस होता. कोणाच्याही दबावाखाली विद्युत खांबावर चढू नये अशी अट त्याच्या कामात असतानाही रोहित्र बिघाडाच्या कामात त्याला टाकण्यात आल्याने या प्रकारासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


अर्नाळा परिसरात ३० मे रोजी विद्युत रोहित्र दुरुस्तीचे काम करीत असताना चार जणांना विजेचा धक्का बसला. या घटनेत जयेश घरत या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या जयेशची ड्यूटी रात्रीच झाली होती. तरीसुद्धा त्याला सकाळी पुन्हा रोहित्र दुरुस्तीचे कामासाठी बोलवण्यात आले. त्याचप्रमाणे संबंधित कामाच्या ठिकाणी प्रशिक्षित लाईनमन व कर्मचारी असताना जयेशला मुख्य कामाची जबाबदारी देण्यात आली.


विजेचा धक्का लागल्यानंतर जयेशवर उपचार व्हावेत यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ काहीही प्रयत्न केले नाहीत. त्याचप्रमाणे या घटनेत मृत्यू झालेल्या जयेशचा मृतदेह सुद्धा नातेवाइकांना काढावा लागला असा आरोप जयेशचा भाऊ प्रशांत घरतने केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला मनुष्यबळ पुरविणाऱ्या जेके इंटरप्राईजेस, अहिल्यानगर या एजन्सीने जयेश घरत याला बाह्यस्रोत मदतनीस म्हणून महावितरण कंपन्यांच्या कामावर पाठवले होते. १ जानेवारी २०२५ पासून, ६ महिन्यांच्या कालावधीसाठी जयेश सोबत कामाबाबत करार करण्यात
आला होता.


वीज वितरण कंपनी, एजन्सी आणि मृत जयेश यांच्यामध्ये झालेल्या करारात २५ अटी आहेत. यापैकीच असलेल्या अट क्रमांक ४, ६ आणि २५ नुसार कोणत्याही विद्युत खांबावर चढणे जयेश घरतचे अधिकारिक काम नसून, कोणाच्याही दबावाखाली त्याने खांबावर चढू नये , तसेच त्याला वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना केवळ मदतनीस म्हणून काम करावयाचे आहे असे करारात नमूद आहे. त्यामुळे रोहित्र बिघाडाच्या मुख्य कामात जयेशचा काहीही संबंध नव्हता, असे असतानाही रोहित्र दुरुस्तीचे काम जयेश कडून करून घेणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे करारावरून स्पष्ट होत आहे. एकंदरीतच सदर काम करतेवेळी संबंधित परिसरात विद्युत पुरवठा बंद असतानाही, जयेशसह इतर तीन कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का कसा लागला याचा शोध घेण्यासोबतच, या कामासाठी त्याची निवड करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रशांत घरत यांनी केली आहे.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष हरले, मात्र जिल्हाध्यक्ष जिंकले

जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

टिळक भवनात आज काँग्रेसची खलबते वसई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी