कळवण तालुक्यातील अवकाळी पंचनाम्यांचा अहवाल सादर

नुकसान भरपाईसाठी लागणार १ कोटी रु.


कळवण : वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कळवण तालुक्यांमधील ९२ गावांमधील ९४६ शेतकऱ्यांच्या ३७८.२५ हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. आमदार नितीन पवार यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांनुसार महसूल, कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनस्तरावर १ कोटी २ लाख ११ हजार ४१० रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनस्तरावर सादर केला आहे.


एप्रिलपाठोपाठ मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसला. ६ ते १४ मेदरम्यान तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात दाणादाण उडाली. काठरे दिगर, सुपले दिगर, खर्डेदिगर, पुनंदनगर, शिरसमणी, एकलहरे, नाकोडे, बेज, कोसवण, खिराड, मोहपाडा, तिन्हळ खुर्द, सरलेदिगर, मळगाव खुर्द, पिंपळे बु, दरेभणगी, भैताणेदिगर, कोसुर्डे, जामले हतगड, चाफापाडा येथील घरांचे पत्रे, कांदा चाळीचे पत्रे, भिंत पडून घराचे तसेच बैल गोठा, हॉटेल व घरांचे ९८ ठिकाणी नुकसान झाले होते.


महसूल, कृषी विभागाच्या संयुक्त अहवालनुसार फळपिके सोडून कोरडवाहू जिराईत पिकाखालील ३३ टक्क्यांवरील एका शेतकऱ्याचे ०.१० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून, १३६० रुपयांची नुकसानभरपाई अपेक्षित आहे. फळपिके सोडून बागायत वार्षिक फळ पिकाखालील ९१ गावे बाधित झाले असून, ९४५ शेतकऱ्यांचे ३७८.१५ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे.
त्यात कांदा ३२६.५० हेक्टर, गहू ०.५० हेक्टर, २३.४५ हेक्टर बाजरी, ४.८० हेक्टर मिरची, ९.१० हेक्टर टोमॅटो, मका ०.२० हेक्टर, भाजीपाला १३. ६० हेक्टर
नुकसान झाले.



कांद्याचे ३२६ हेक्टर क्षेत्रात नुकसान


अवकाळी पावसामुळे सुमारे ३७८ हेक्टरवरील उभे पीक, भाजीपाला, आंवा, फळ वागा आणि काढणी करून ठेवलेला कांदा, मका यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. यात उन्हाळी कांदा लागवड क्षेत्र २८ हजार ७१६ हेक्टर कांद्याचे क्षेत्र असून, त्यात ३२६.५० हेक्टर क्षेत्रावरील शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.



उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवण दौऱ्यात नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठविण्याच्या सूचना केल्याने अहवाल सादर झाला आहे.
- नितीन पवार, आमदार

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ९२ गावांतील ३७८.२५ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ९४६ शेतकऱ्याच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. ९८ ठिकाणी घर व कांदा चाळीचे नुकसान झाले आहे. मदतीसाठी नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.
- रोहिदास वारुळे, तहसीलदार कळवण

Comments
Add Comment

नाशिक जिल्ह्यातील ११ नगर परिषदांसाठी आज होणार मतदान

नगरसेवक पदासाठी १०२८, तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार आखाड्यात नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ११

कुंभमेळा आरक्षित क्षेत्राचे संपादन न करता कारवाई रद्द करावी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर

Nashik Crime News : भिंतीवर 'बिब्बा' आणि 'नागाच्या आकाराचा खिळा'! ७ पानी सुसाईड नोट लिहून संपवलं होतं नेहाने जीवन, नेहाच्या घरात बरंच काही मिळालं...

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडीत राहणाऱ्या नेहा संतोष पवार या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात एक

Nashik Crime : ७ पानी सुसाइड नोट! अवघ्या ५ महिन्यांपूर्वी गृहप्रवेश झाला, अन् सासरच्या छळाला कंटाळून नववधूची आत्महत्त्या!

नाशिक : नाशिक शहरातील हिरावाडी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीसह सासरच्या

इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित अपघातात गंभीर जखमी

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित अपघातात गंभीर जखमी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या ६६ किमी परिक्रमा मार्गाला ‘हिरवा कंदील’

भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणीकरिता सात हजार ९२२.११ कोटी रुपयांचा निधी मंजूर नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ