Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

  78

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती आरोपी मेहूल चोक्सीची सर्व संपत्ती ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. सेबीने चौकसीचे सगळी बँक खाती,लॉकर, इतर मालमत्ता ताब्यात घेतली आहे. 'गितांजली जेम्स' प्रकरणात इनसायडर ट्रेडिंग (Insider Trading) प्रकरणात फरार आरोपी नीरव मोदीचा काका मेहूल चोक्सी परदेशात फरार असले तरी २०११ ते २०१८ या काळात पंजाब नॅशनल बँकेच्या बनावट 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' (Letter of Undertaking) प्रकरणी मेहूल चौकसी अडचणीत आले. १३८५० कोटींच्या विना तारण कर्ज घेतल्याप्रकरणी एजन्सीचा रडारवर चोक्सी आले होते. इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात राकेश गजरा यांना स्वतः चाच कंपनी गितांजलीमधील समभाग विकून टाकण्याचा सल्ला दिला होता.

लेटर ऑफ अंडरटेकिंग या घोटाळ्याच्या भविष्यातील पार्श्वभूमीवर आगामी काळातील नुकसान वाचवण्यासाठी हे समभाग (Shares) विकण्यास सांगितले त्यानुसार गजरा यांना हे ५.७५ टक्के समभाग  २०१७ मध्ये विकले होते. सेबीने २०२२ मध्ये १.५ कोटींचा दंड चोक्सींना ठोठावला होता. मात्र आजतागायत तो न भरल्याने ती रक्कम २.१० कोटीवर पोहोचली. २०१८ मध्ये मेहूल चोक्सी भारतातून फरार झाले होते. बेल्जियम देशाशी प्रत्यार्पण करारात (Extradition Treaty) अंतर्गत अटक करून सीबीआयने व ईडीने बेल्जियममध्ये अटक केली होती. सध्या ते बेल्जियममधील तुरूंगातील आहेत. त्यामुळे भारत सरकारने त्यांना मायदेशी परत आणण्याची कार्यवाही सुरू केल्याचे म्हटले जात आहे.

गितांजली या कंपनीचे मालक चोक्सी हे दंडाची रक्कम परतफेड करण्यासाठी मालमत्ता विकू शकतात यापूर्वीच सेबीने जप्तीचा निर्णय घेतला. हा ६०९७ कोटीचा घोटाळा होता. त्यांच्या कंपनीचे बाजार मूल्यांकन (Market Valuation) ६४९८ कोटी होते. या मोठ्या घोटाळ्यातील पैसै चुकते करण्यासाठी सरकारने मोठी तयारी सुरु केली. घोटाळ्याच्या तपासादरम्यान यांची गंभीरता लक्षात आल्याने आर्थिक विश्वात खळबळ माजली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोअर बँकिंग मूल्यांकडे कानाडोळा करत बायपास केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. बँकेच्या मुख्य प्रणालीमध्ये नोंद न करता या हमी अनाधिकृतपणे जारी केल्या जाऊ लागल्या. आयात व्यवहारांसाठी असलेल्या निधीचा गैरवापर करण्यात आला आणि जुन्या व्यवहारांची परतफेड करण्यासाठी नवीन एलओयू वापरण्यात आले. हा घोटाळा वर्षानुवर्षे चालू होता.

एप्रिलमध्ये, भारतीय तपास यंत्रणांनी प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. गेल्या वर्षी ते वैद्यकीय उपचारांसाठी बेल्जियमला गेले होते तेव्हा ते तिथे होते. भारत सोडल्यानंतर तो २०१८ पासून अँटिग्वामध्ये राहत होते. जूनच्या चार तारखेला सेबीने काढलेल्या नोटीसीतील माहितीनुसार,चोक्सींचे २.१ कोटी दंड व ४० लाख रूपये व्याज अजून चुकते केले गेले नाहीत. यासाठी सेबीने चोक्सींचे अकाऊंट जप्त करण्याची विनंती बँकांना, डिपोझिटरी सीबीएसएल (CDSL) , एनएसडीएल (NSDL) यांना केली होती.

मे २०२३ मध्ये, सेबीने चोक्सीला नोटीस पाठवून गीतांजली जेम्सच्या शेअर्समध्ये फसव्या व्यवहाराशी संबंधित प्रकरणात ₹५.३५ कोटी भरण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत एकूण घोटाळ्यांची किंमत १३७५० कोटींच्या घरात आहे. घोटाळ्यापैकी नीरव मोदीच्या कंपन्याशी संबंधित ६,४९८ कोटी रुपयांशी आणि चोक्सीच्या गीतांजली ग्रुपशी ६,०९७ कोटी रुपयांचा घोटाळा अंतर्भूत असून यामध्ये व्याज आणि इतर शुल्क समाविष्ट आहे.

 
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही