सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालय अर्थात आयजीएमसी येथे शुक्रवार रोजी दाखल करण्यात आले. तब्येत बिघडल्यामुळे सोनिया गांधी यांना शुक्रवार रोजी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अनुभव डॉक्टरांचे पथक सोनिया गांधी यांच्यावर उपचार करत आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांचे मुख्य माध्यम सल्लागार नरेश चौहान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना त्यांनी सोनिया गांधी यांना सिमल्याच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालय येथे दाखल केल्याची माहिती दिली. वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असल्याचे ते म्हणाले.

सोनिया गांधी छराबडा येथील एका खासगी बंगल्यात विश्रांती घेत होत्या. या बंगल्यात असतानाच सोनिया यांची तब्येत बिघडली. यानंतर सोनिया गांधी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनिया गांधी रुग्णालयात असल्यामुळे रुग्णालयाची इमारत आणि भोवतालचा परिसर येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेसच्या नेत्यांची रुग्णालयाच्या आवारात ये - जा सुरू असल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे