Block Deal News: बजाज फिनसर्व्हने आपले १.८% भागभांडवल ' यांना' विकले एनएसईतील २..३० टक्क्याने शेअर्स तेजीत

  45

प्रतिनिधी: वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार बजाज फिनसर्व्ह कंपनीत एसबीआय मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सच या कंपन्यांनी संचयी पद्धतीने १.८ टक्के समभाग (Share) भागभांडवल खरेदी केले आहे. या कंपन्यांनी २.८६ कोटी समभाग म्हणजेच १.८ टक्के समभाग खरेदी केले. या समभागांची बाजार किंमत ५५०६.०७ कोटी रूपयांच्या घरात आहे.

याशिवाय जेपी मॉर्गन, सिटी ग्रुप, सोईटी जनरले (Societe Generale), एसबीआय लाईफ, बोफा सिक्युरिटीज, बार्कले मर्चंट बँक (सिंगापूर) यांनी बजाज फिनसर्व्ह भागभांडवल खरेदी केले आहे. बजाज फिनसर्व्हचे प्रवर्तक (Promoter) बजाज होल्डिंग अँड इनव्हेसमेंट व जमनालाल सन्स यांनी एकत्रितपणे समप्रमाणात आपले समभाग संबंधित कंपन्यांना विकले आहेत. यानंतर बजाज प्रवर्तकांचा भागभांडवल हिस्सा ६०.४० टक्क्यांवरुन ५८.६४ टक्क्यांवर पोहोचला.

फ्रँकलिन टेंपलटन म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड, एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्स, गोल्डमन सच या कंपन्यानी कर्मशिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टिम या कंपनीचेही भागभांडवल ब्लॉक डील (Block Deal) पद्धतीने विकले आहेत. बजाज फिनसर्व्हचे काल शेअर बाजारात एनएसईवर बजाज फिनसर्व्हचे समभाग २.३० टक्क्यांनी वाढून १,९८८.७० रुपयांवर बंद झाले होते.

या वर्षाच्या सुरुवातीला, बजाज फिनसर्व्हने जमनालाल सन्स आणि बजाज होल्डिंग्जसह, त्यांच्या विमा संयुक्त उपक्रमांमध्ये अलायन्झ एसईचा हिस्सा २.७८ अब्ज डॉलरमध्ये विकत घेतला.आर्थिक वर्ष २५ मध्ये वित्तीय सेवा कंपनीने २१ टक्क्यांनी महसूल वाढ नोंदवली आणि ती १५३८२ कोटी रुपयांवर पोहोचली, तर निव्वळ नफा (Gross Profit) ९ टक्क्यांनी वाढून १०२० कोटी रुपयांवर पोहोचला.
Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन