‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर

नीना कुलकर्णी व सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार


मुंबई : दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा ‘पुरस्कार वितरण समारंभ’ शनिवार, दिनांक १४ जून २०२५ रोजी यशवंत नाटय मंदिर,माटुंगा येथे संपन्न होणार आहे.



हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्यात व्यावसायिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (नाटक : उर्मिलायन), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अद्वैत दादरकर (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे (नाटक : मास्टर माइंड), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार निषाद गोलांबरे (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार राजेश परब (नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक असेन मी नसेन मी (संस्था : स्क्रीप्टज क्रिएशन), सर्वोत्कृष्ट अभिनेता सुव्रत जोशी (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रशांत दामले (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हृषीकेश शेलार (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना कुलकर्णी (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री शर्मिला शिंदे (नाटक : ज्याची त्याची लव स्टोरी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शुभांगी गोखले (नाटक : असेन मी नसेन मी) आणि अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार निहारिका राजदत्त (नाटक : उर्मिलायन), नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार सुशांत शेलार यांना प्रदान करण्यात येणार आहेत.


प्रायोगिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत आनंदमठ (संस्था : कल्पक ग्रुप, पुणे), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक मिडिआ (संस्था : रुद्रेश्वर, गोवा), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक मुकुल ढेकळे (सं. नाटक : मून विदाऊट स्काय), सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार यशवंत चोपडे (सं. नाटक : ब्लँक इक्वेशन) यांची निवड करण्यात आली.


तसेच नाट्य क्षेत्रातील निर्मात्यांना आणि नाट्य व्यवस्थापकांना सहकार्य केल्याबद्दल मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या प्रशासकीय अधिकारी वृषाली शेट्ये यांना आणि ५१ वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग, कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी