जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. या पुलाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिरंगा घेऊन पुलावरुन चालत एक फेरी मारली.

अतिरेक्यांची दहशत असताना मागील काही दशके जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक ठिकाणी तिरंगा हाती घेऊन वावरणे अशक्य होते. पण मोदी सरकारच्या नेतृत्वात संसदेने बहुमताने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवले. यानंतर अतिरेक्यांविरोधात भारताने कठोर पवित्रा घेतला आणि हळू हळू वातावरण बदलण्यास सुरुवात झाली. आज (शुक्रवार ६ जून २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब रेल्वे पूल या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा हाती घेऊन चालत एक फेरी मारली. पंतप्रधान मोदींनी चिनाब पुलाची पाहणी केली. तसेच पंतप्रधान मोदींनी अंजी पुलाचेही उद्घाटन केले. अंजी पूल हा भारतातील पहिला केबल रेल्वे पूल आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला, जी खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडणारी पहिली ट्रेन आहे. कटरा रेल्वे स्थानकावर कटरा-श्रीनगर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी पंतप्रधानांनी ट्रेनमधील प्रवाशांशी आणि क्रू सदस्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी व्ह्यू पॉइंटवर

पंतप्रधान मोदी चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाजवळील 'व्ह्यू पॉइंट'वर पोहोचले आणि त्यांना काश्मीरला उर्वरित देशाशी रेल्वेने जोडण्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव , जितेंद्र सिंह आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह प्रतिष्ठित पुलाजवळ उभारलेल्या रेल्वे संग्रहालयाला भेट दिली. पंतप्रधान 'व्ह्यू पॉइंट' वर गेले आणि त्यांना चिनाब पुलाची माहिती देण्यात आली, जो नदीपासून ३५९ मीटर उंचीवर वसलेला अभियांत्रिकी चमत्कार आहे, जो पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे.

अभियंते आणि कामगारांशी संवाद

पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केल्यानंतर अभियंते आणि कामगारांशी संवाद साधला.

 
Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

Liquor Ban : दारू मिळणारच नाही...ओल्ड मॉन्क सह 'या' प्रसिद्ध ब्रँड्सवर बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील लोकप्रिय आणि

Melody Tiramisu Flavour : 'मेलोडी'चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या 'त्या' गिफ्टवरून पारलेने लाँच केला 'Melody Tiramisu'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यातील

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

CJP Protest Case : 'गुन्हेगारांना सोडणार नाही'; CJP आंदोलन प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट विधान

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना