आता गृहनिर्माण प्रकल्पाच्या महारेरा नोंदणी प्रमाणपत्रावर इत्यंभुत माहिती

 समग्र तपशील प्रमाणपत्राच्या परिशिष्टात


मुंबई : येथून पुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र आणि त्यासोबतचे परिशिष्ट वाचले तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते, हे लक्षात घेऊन ग्राहककेंद्रीत अमुलाग्र बदल केले आहेत. पूर्वीच्या प्रमाणपत्रात फक्त प्रकल्प आणि प्रवर्तकाचे नाव, पत्ते एका ओळीत दिले जायचे. आता ही माहिती वाचायला आणि समजायला सोपी जावी यासाठी बुलेट पॉईंट्स मध्ये दिलेली आहे.


शिवाय या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ; इमारतीचे व विंग्सचे नाव किंवा क्रमांक; प्रकल्पातील निवासयोग्य मजले; प्रकल्पातील निवासी सदनिका आणि अनिवासी गाळ्यांची एकूण संख्या; इमारतीला किती मजल्यांपर्यंत परवानगी मिळालेली आहे त्याचा तपशील दर्शवणारे अत्यंत महत्त्वाचे प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी); चारचाकी, दुचाकी आणि अभ्यागतांसाठींच्या (व्हिजिटर्स पार्किंग) एकूण पार्किंगची संख्या हा समग्र तपशील या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात पहिल्यांदाच असणार आहे.


एवढेच नाही पुढे त्या प्रकल्पाच्या आयुष्यात प्रवर्तकाने प्रकल्पाच्या कुठल्याही बाबीत काही दुरुस्त्या केल्यास, प्रकल्पाला मुदतवाढ घेतल्यास किंवा प्रकल्पाचे दुसऱ्या प्रवर्तकाकडे हस्तांतरण केल्यास हा तपशीलही या प्रकल्पाला भविष्यात दिल्या जाणाऱ्या सुधारित प्रमाणपत्रात राहणार आहे. सर्व प्रवर्तक हे प्रमाणपत्र प्रकल्पस्थळी, प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रदर्शित करीत असतातच.


प्रकल्पाच्या नोंदणीक्रमांकाच्या मदतीने प्रकल्पाबाबतची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर शोधताना पहिल्याच पानावर या प्रमाणपत्राची लिंक असते. याशिवाय प्रकल्पाशी संबंधित सर्व प्राथमिक माहिती क्यूआर कोड मध्ये देऊन सर्व माध्यमांतील जाहिरातींमध्ये प्रकल्पाच्या नोंदणीक्रमांकासोबत छापणे पूर्वीच महारेराने बंधनकारक केलेले आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करूनही प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती मिळवतायेऊ शकते.


घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाबदेयता आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महारेराने यापूर्वी घेतलेले आहेत. त्यात प्रमाणित घर विक्री करार, घर नोंदणीपत्र; पार्किंगची लांबी, रुंदी, उंची, स्थळ शिवाय आश्वासित सेवा सुविधांच्या उपलब्धतेचे तपशील अशा बाबी अपरिवर्तनी असल्याचे महारेराने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. या निर्णयांचा घरखरेदीदारांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत असून देशातील इतर अनेक विनियामक प्राधिकरणांनीही त्यांच्या क्षेत्रात या निर्णयांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे.


नोंदणी प्रमाणपत्रात वरील उपयुक्त माहिती समाविष्ट करण्याचा हा निर्णयही असाच ग्राहकांना चांगल्या प्रकारे मदत करणारा, पथदर्शक आणि महत्त्वपूर्ण आहे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,