राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली, तर खरी क्रांती : शिवगिरी महाराज

संगमनेर : धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती घडते.अशीच क्रांती आयोध्येतील राम मंदिर बांधून रामराज्य आले असल्याचे गौरवोद्गार त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरी महाराज यांनी काढले.


संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्यावतीने गेली सात दिवसापासून सुरू असलेल्या शिव पुराण कथेची भक्तिमय वातावरणामध्ये सांगता झाली त्यावेळी भाविक भक्तांना उपदेश करताना १००८ शिवगिरी महाराज बोलत होते यावेळी कोपरगाव येथील जनार्धन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, नारायणपूर येथील अण्णा महाराज यांचे उत्तर अधिकारी टेंबे स्वामी महाराज आ.खताळ खा.वाकचौरे,माजीमंत्री बाळासाहेब थोरात हरीओम वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख अविनाश वाकचौरे यांच्यासह इतर सर्वच राजकीय पक्षाचे नेते गण उपस्थित होते.शिवगिरी महाराज म्हणाले की,हिंदू धर्मियांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार घेत हिंदू धर्माची मशाल प्रत्येकाने आपल्या अंतकरणात पेटवून ठेवली पाहिजे;धर्मकार्यामध्ये प्रत्येकाने या शिवपुराण महा कथेचे श्रवण करून आचरणात आणणे गरजेचे आहे.


धार्मिक कार्याचे व्यासपीठ आहे आणि त्याचे पावित्र्य प्रत्येकाने राखले पाहिजे.तुम्हा सर्वांवर भगवंताची कृपा अखंड अशीच राहावी आणि यांच्या हातून तुमच्या हातून या हिंदू धर्माचे कार्य असेच होत राहो साधूसंतांचे आपल्यावर खूप मोठे संस्कार केले आहे.ते संस्कार प्रत्येकाने जोपासणे गरजेचे असल्याचे सांगत ते म्हणाले की पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे या कुंभमेळ्याचा उल्लेख करत, तो प्रयाग राज कुंभापेक्षाही भव्य होणार असल्याची अपेक्षा शिवगिरी महाराज यांनी व्यक्त केली. यावेळी टेंबे स्वामी महाराजांची संगमनेर ते धांदरफळ मोटरसायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले तसेच संपूर्ण गावातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तसेच रामेश्वर मंदिरात त्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. ही शिवपुराण कथा यशस्वी करण्यासाठी हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्या सर्व भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी