Friday, June 13, 2025

सरकार क्रीडा क्षेत्राला चालना देत आहे : चंद्रशेखर बावनकुळे

सरकार क्रीडा क्षेत्राला चालना देत आहे : चंद्रशेखर बावनकुळे
शेवगाव : आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात गावा-गावात खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम करत आहे.सर्व जिल्ह्यातील गावागावातून आणि नगर पालिकांच्या प्रत्येक प्रभागातून विविध खेळाचे किमान एकेक चॅम्पियन तयार झाले पाहिजेत असे क्रीडा क्षेत्राला महत्त्व देऊन क्रीडा धोरणाचे नियोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

शेवगाव येथे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी बावनकुळे बोलत होते. खंडोबा मैदानावर झालेल्या या स्पर्धेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आ. विठ्ठलराव लंघे पाटील, प्रताप ढाकणे,जिपचे माजी सदस्य अर्जून शिरसाठ,जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे,खजिनदार पै.नाना डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नंदू मुंढे, बापूराव चव्हाण, युवराज पठारे, विक्रम बारवकर, तुषार वैद्य, अमोल सागडे, डॉ. कृष्णा देहाडराय, एकनाथ कुसळकर, अंकुश कुसळकर, कडू मगर, कमलेश गांधी, दिगंबर काथवटे, वजीर पठाण, सालार शेख, उदय मुंढे, माजी सैनिक विनोद शेळके, पप्पू केदार, अंकुश ढाकणे, सोमा मोहिते, प्रकाश चित्ते जगदीश धूत आदींसह संयोजन समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात जे कल्याणकारी उपक्रम राबवले, ते जसेच्या तसे महाराष्ट्रात राबविण्याचा सरकारचा संकल्प आहे. राज्यात पुढील पाच वर्षांनी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी व १२ तास वीज मोफत मिळणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले,राम शिंदे यांची कुस्ती थोड्या वरून हुकली,थोडी कुस्ती राहिली होती.महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळ खेळला गेला पाहिजे.
Comments
Add Comment