या ठिकाणी पाच रुपयांचा पार्ले जी बिस्किटांचा पुडा २३०० रुपयांत मिळतो

गाझा : पार्ले जी बिस्कीट एक लोकप्रिय ब्रँड आहे. भारतात मागील अनेक दशकांपासून पार्ले जी बिस्किटांची विक्री सुरू आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांनी पार्ले जी बिस्किटांची चव चाखली आहे. भारताबाहेर पण पार्ले जी बिस्किटे जातात. एक्स प्लॅटफॉर्मवर पार्ले जी बिस्किटांचा एक फोटो व्हायरल होत आहे. पॅलेस्टाईनमधील मोहम्मद जवाद नावाच्या तरुणाच्या घरातला हा फोटो आहे. फोटो मोहम्मद जवाद आणि त्याची मुलगी दिसत आहे. मुलीला आवडते म्हणून मोहम्मद जवादने पार्ले जी च्या छोट्या पुड्यांचे होलसेल पॅक खरेदी करुन आणले आहे. मोहम्मद जवादने दिलेल्या माहितीनुसार युद्ध सुरू असलेल्या गाझा पट्टीत पाच रुपयांचा पार्ले जी बिस्किटांचा पुडा २३०० रुपयांत मिळतो आहे.



गाझा पट्टीत हमास अतिरेक्यांचे तळ आहेत. नागरी वस्तीत प्रामुख्याने धार्मिक इमारती, शाळा आणि रुग्णालयांच्या इमारतीखाली भूमिगत स्वरुपात हमासच्या अतिरेक्यांचे तळ आहेत. हे तळ नष्ट करण्यासाठी नाईलाज म्हणून नागरी वस्तीवर थेट हल्ला करावा लागतो, असे इस्रायल सरकारचे म्हणणे आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टीत राहणे कठीण झाले आहे. गाझातील नागरी सुविधांची वाताहत झाली आहे. अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे आणि एरवी शहरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंची वानवा भासू लागल्यामुळे महागाई गगनाला भिडू लागली आहे. यामुळे आधी दीड युरोत मिळणारा पार्ले जी बिस्किटांचा पुडा आता २४ युरोत मिळत आहे. पण मुलीला आवडते म्हणून खर्च करुन पार्ले जी बिस्किटांचे पुडे आणल्याचे मोहम्मद जवादने सांगितले.

मोहम्मद जवादची एक्स पोस्ट बघितल्यावर भारतातील एक्स प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या काही जणांनी थेट परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना टॅग केले आहे. पॅलेस्टाईनमध्ये प्रामुख्याने गाझा पट्टीत पार्ले जी बिस्किटांचा अतिरिक्त साठा पाठवू शकतो का, असा प्रश्न एक्स प्लॅटफॉर्मवरुन विचारला आहे.
Comments
Add Comment

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)