डिनो मोरियाच्या घरी ईडीची छापेमारी, मातोश्रीत टेन्शन, आदित्य अडकणार? उद्धव गटाचे धाबे दणाणले!

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याचा तपास करताना आज ईडीने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबई आणि कोचीतील संपत्तीवर छापे टाकले. सकाळी ८ पासून सुरू असलेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीमुळे आता या प्रकरणात आदित्य ठाकरे अडकणार असल्याच्या शक्यतेने मातोश्रीत टेन्शन निर्माण झाले आहे. कारण डिनो मोरिया हा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा अत्यंत जवळचा सहकारी मानला जातो, त्यामुळे या घोटाळ्याला आता राजकीय रंग चढू लागला आहे.


ईडीने मुंबई आणि कोचीसह १५ ठिकाणी छापे टाकून बँक व्यवहार, आर्थिक कागदपत्रं, इलेक्ट्रॉनिक डेटा आणि व्यवहार नोंदींची सखोल चौकशी केली आहे. मुंबई महापालिकेच्या ११०० कोटींच्या मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पात ६५ कोटी ५४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, या प्रकरणात बोगस काम, फुगवलेले बिल, आणि निधी वळवण्याचे गंभीर आरोप आहेत.



डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरियाची याआधी आर्थिक गुन्हे शाखेकडून ८ तास सखोल चौकशी झाली होती. यात २०१९ ते २०२२ या कालावधीत डिनो मोरिया आणि अटक झालेला व्यावसायिक केतन कदम यांच्यात कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. ईडीकडून सध्या त्याच दिशेने पुरावे गोळा केले जात आहेत.


या प्रकरणात सहभागी असलेल्या कंत्राटदार कंपन्यांचीही कसून चौकशी सुरू आहे. सध्या ऑडिट फर्ममार्फत आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक लेखापरीक्षण सुरू असून येत्या काही दिवसांत अधिक मोठ्या नावांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मिठी नदीच्या नावाने २० वर्षांत शेकडो कोटी खर्च झाले, पण दरवर्षी पावसात मुंबई जलमय का होते? याचं उत्तर आता हळूहळू बाहेर पडायला लागले आहे. महापालिकेत गेल्या २०-२५ वर्षात झालेले घोटाळे, फसवणूक आणि सत्ताधाऱ्यांचा सहभाग आता उजेडात येत आहे. यामुळे मातोश्री आणि उद्धव गटाचे धाबे दणाणले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून