Bangalore Stampede प्रकरणावर विराटने दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: बंगळुरूत बुधवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेवर आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची प्रतिक्रिया समोर आली आहे. कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, या घटनेनंतर मी पूर्णपणे कोसळलो आहे आणि माझ्याकडे शब्द नाहीत.



आरसीबीने या दुर्घटनेवर काय म्हटले...


आरसीबीने या घटनेप्रकरणी दुख: व्यक्त करत म्हटले, आज दुपारी संघाच्या प्रतीक्षेत असलेल्या बंगळुरूमध्ये लोकांच्या चेंगराचेंगरीची दुर्घटनेबद्दल ऐकल्यानंतर आम्ही खूप दु:खी आहोत. सर्वांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरसीबीला याचे खूप दुख: झाले असून मृत कुटुंबियांच्या प्रती आमच्या संवेदना आहेत. परिस्थिती समोर आल्यानंतर आम्ही लगेचच कार्यक्रमात बदल केला आणि स्थानिक प्रशासनाचे मार्गदर्शन आणि सूचनांचे पालन केले. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना आग्रह करतो की त्यांनी सुरक्षित राहावे.






कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी क्रिकेट असोसिएशनला जबाबदार ठरवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या